Lokmat Money > बिझनेस न्यूज > विविध चिंतांमुळे बाजारात झाली घसरण...

विविध चिंतांमुळे बाजारात झाली घसरण...

सप्ताहाचा प्रारंभ बाजारात वाढीने झाला. संवेदनशील निर्देशांक ५३,१२६.७३ अंशांवर खुला झाला. हाच या सप्ताहातील उच्चांकही होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 10:47 AM2021-07-05T10:47:18+5:302021-07-05T10:47:42+5:30

सप्ताहाचा प्रारंभ बाजारात वाढीने झाला. संवेदनशील निर्देशांक ५३,१२६.७३ अंशांवर खुला झाला. हाच या सप्ताहातील उच्चांकही होता.

The market fell due to various concerns | विविध चिंतांमुळे बाजारात झाली घसरण...

विविध चिंतांमुळे बाजारात झाली घसरण...

प्रसाद गो. जोशी -

कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी अद्यापही अर्थव्यवस्था फारसा वेग घेत नाही. त्याचप्रमाणे परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली विक्री आणि कमी झालेला पीएमआय यामुळे बाजाराची चिंता वाढली आहे. यामुळे गत सप्ताहात शुक्रवारचा अपवाद वगळता बाजारात घसरण झाली. त्यामुळे सप्ताहामध्ये प्रमुख निर्देशांक घसरले असले तरी स्मॉल कॅप निर्देशांकामध्ये मात्र वाढ झाली आहे. 



सप्ताहाचा प्रारंभ बाजारात वाढीने झाला. संवेदनशील निर्देशांक ५३,१२६.७३ अंशांवर खुला झाला. हाच या सप्ताहातील उच्चांकही होता. त्यानंतर मात्र बाजारात नफा कमविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली. याचा परिणाम निर्देशांकाच्या घसरणीच्या रुपाने बघावयास मिळाला. त्यातच परकीय वित्तसंस्थांनीही विक्री सुरू ठेवल्याने बाजार खाली आला. स्माॅल कॅप  निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाला.

गतसप्ताहातील स्थिती
निर्देशांक    बंद मूल्य      बदल
सेन्सेक्स    ५२,४८४.६७   - ४४०.३८
निफ्टी      १५,७२२.२०     - १३८.१५
मिडकॅप     २२,५०५.८२        - ४३.८३
स्मॉलकॅप   २५,५६७.२६     ४२०.९६
 

Web Title: The market fell due to various concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.