Lokmat Money > बिझनेस न्यूज > 31 मार्च : आजचा दिवस संपण्यापूर्वी नक्की आटोपून घ्या ही तीन कामे

31 मार्च : आजचा दिवस संपण्यापूर्वी नक्की आटोपून घ्या ही तीन कामे

आज 31 मार्च, 2018-19 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. दरम्यान,आजचा दिवस मावळण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण कामे नक्की आटोपून घ्यावी लागणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 08:38 AM2019-03-31T08:38:02+5:302019-03-31T08:39:05+5:30

आज 31 मार्च, 2018-19 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. दरम्यान,आजचा दिवस मावळण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण कामे नक्की आटोपून घ्यावी लागणार आहेत.

March 31: Three tasks to be completed before the end of today's day | 31 मार्च : आजचा दिवस संपण्यापूर्वी नक्की आटोपून घ्या ही तीन कामे

31 मार्च : आजचा दिवस संपण्यापूर्वी नक्की आटोपून घ्या ही तीन कामे

नवी दिली - आज 31 मार्च, 2018-19 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस.  दरम्यान, काही महत्त्वपूर्ण कामे आटोपून घेण्यासाठी सरत्या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस ही अखेरची मुदत आहे. त्यामुळे आजचा दिवस मावळण्यापूर्वी ही मह्त्त्वपूर्ण कामे नक्की आटोपून घ्यावी लागणार आहेत. या कामांमध्ये पॅन-कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे, टीव्ही चॅनेल निवडणे, जीएसटी रिटर्न भरणे, आणि प्राप्तिकर रिटर्न भरणे, अशी महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत.

पॅन-आधार लिंक 
पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी सरकारने 31 मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे. तिचा आज शेवटचा दिवस आहे. आज पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड निरुपयोगी ठरणार आहे. त्यामुळे प्राप्तिकर विवरण भरणे तुम्हाला शक्य होणार नाही. पॅन-आधार लिंक करण्याचे चार मार्ग आहेत. जर तुम्ही आधार आणि पॅन लिंक केले असेल तर प्रप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन पॅन आणि आधार कार्ड लिंक झाले आहे की नाही याची पडताळणी करून घेऊ शकता.

 टीव्ही चॅनेल निवडण्याची शेवटची तारीख 
टीव्हीवर कोणते चॅनेल पाहायचे आहेत, त्याची निवड करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ट्रायने ग्राहकांच्या फायद्यासाठी त्यांना हवे असलेलेच चॅनेल केबल, डीटीएच चालकांनी दाखवावेत, असा नियम लागू केला आहे. यासाठीची मुदत आज संपणार आहे.

आयटीआर/जीएसटी रिटर्न 
 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचा प्राप्तिकर आणि जीएसटी रिटर्न भरण्याची अखेरची तारीख 31 मार्च आहे. इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यास एक हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. मात्र करदात्याचे एकूण आर्थिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर दंडात्मक रक्कम 1 हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल. त्यासाठी प्राप्तिकर आणि जीएसटीची कार्यालये 31 मार्च रोजी उघडी राहणार आहेत.  प्राप्तिकर आणि जीएसटी कार्यालयांसोबत सरकारी बँका आणि रिझर्व्ह बँकसुद्धा रविवारी उघडी राहणार आहे. 

Web Title: March 31: Three tasks to be completed before the end of today's day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.