Lokmat Money > बिझनेस न्यूज > Domestic LPG Cylinder Price Hike: सणासुदीपूर्वीच महागाईचा पुन्हा झटका; विना अनुदानीत LPG सिलिंडरची दरवाढ

Domestic LPG Cylinder Price Hike: सणासुदीपूर्वीच महागाईचा पुन्हा झटका; विना अनुदानीत LPG सिलिंडरची दरवाढ

पाहा तुमच्या शहरातील LPG Cylinder चे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 10:12 AM2021-10-06T10:12:05+5:302021-10-06T10:13:03+5:30

पाहा तुमच्या शहरातील LPG Cylinder चे नवे दर.

LPG cooking gas cylinder prices hiked by rs 15 Check latest rates | Domestic LPG Cylinder Price Hike: सणासुदीपूर्वीच महागाईचा पुन्हा झटका; विना अनुदानीत LPG सिलिंडरची दरवाढ

Domestic LPG Cylinder Price Hike: सणासुदीपूर्वीच महागाईचा पुन्हा झटका; विना अनुदानीत LPG सिलिंडरची दरवाढ

Highlightsपाहा तुमच्या शहरातील LPG Cylinder चे नवे दर.

Domestic LPG Cylinder Price Hike: सणासुदीपूर्वीच सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका लागला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सरकारी इंधन कंपन्यांनी बुधवारी म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. इंधन कंपन्यांनी विना अनुदानीत १४.२ किलोच्या सिलिंडरच्या दरात १५ रूपयांची वाढ केली. यानंतर आता दिल्लीत एलपीजी गॅस सिलिंडरचे दर८८४.५० रूपयांवरून वाढून ८९९.५० रूपये इतके झाले आहेत.

या महिन्याच्या सुरूवातीला इंधन कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात ४३.५ रूपयांची वाढ केली होती. यादरम्यान घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. परंतु आज गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात आली.

सिलिंडरचे नवे दर
दिल्लीमध्ये विना अनुदानीत १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर आता ८९९.५० रूपये झाले आहेत. तर कोलकात्यामध्ये गॅस सिलिंडरचे दर ९११ रूपयांवरून वाढून ९२६ रूपये, मुंबईत ८८४.५० रूपयांवरून वाढून ८९९.५० रूपये इतकी झाली आहे. तुमच्या शहारातील गॅसच्या दराबाबत https://iocl.com/pages/indane-cooking-gas-overview या ठिकाणी माहिती घेता येईल

याच वर्षी जानेवारी महिन्यात १ जानेवारी रोजी गॅस सिलिंडरचे दर ६९४ रूपये होते. परंतु १ सप्टेंबर रोजी हे दर वाढून ८८४ रूपये झाले. १७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत सिलिंडरच्या दरात ५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सरकारनं नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) दरात ६२ टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महानगर गॅस लिमिटेनं (mahanagar gas limited) सोमवारी सीएनजी (CNG Gas) आणि पीएनजी (PNG) गॅसच्या दरात तात्काळ प्रभावानं २ रूपयांची वाढ केली होती.

Read in English

Web Title: LPG cooking gas cylinder prices hiked by rs 15 Check latest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.