lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC IPO: LIC पॉलिसीधारकांनो इकडे लक्ष द्या; IPO मध्ये शेअर हवेत तर आधी या दोन गोष्टी करा

LIC IPO: LIC पॉलिसीधारकांनो इकडे लक्ष द्या; IPO मध्ये शेअर हवेत तर आधी या दोन गोष्टी करा

LIC policyholders have to do two things First Before IPO Share Purchase: एलआयसी आयपीओतील 10 टक्के शेअर पॉलिसीधारकांना राखीव ठेवणार आहे. ज्या पॉलिसीधारकांना एलआयसीचे शेअर घ्यायचे आहेत त्यांनी या गोष्टी कराव्यात असा सल्ला एलआयसीने दिला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 08:12 PM2021-12-01T20:12:06+5:302022-02-18T13:22:30+5:30

LIC policyholders have to do two things First Before IPO Share Purchase: एलआयसी आयपीओतील 10 टक्के शेअर पॉलिसीधारकांना राखीव ठेवणार आहे. ज्या पॉलिसीधारकांना एलआयसीचे शेअर घ्यायचे आहेत त्यांनी या गोष्टी कराव्यात असा सल्ला एलआयसीने दिला आहे. 

LIC policyholders want to Purchase Shares in the IPO, have to update Pancard KYC and open demat account | LIC IPO: LIC पॉलिसीधारकांनो इकडे लक्ष द्या; IPO मध्ये शेअर हवेत तर आधी या दोन गोष्टी करा

LIC IPO: LIC पॉलिसीधारकांनो इकडे लक्ष द्या; IPO मध्ये शेअर हवेत तर आधी या दोन गोष्टी करा

भारतीय जीवन विमा निगम (LIC) ला आपल्या पॉलिसीधारकांना आयपीओतील शेअर द्यायचे आहेत. यासाठी एलआयसीने पॉलिसीधारकांना सूचना दिली आहे. ज्या पॉलिसीधारकांना एलआयसीचे शेअर घ्यायचे आहेत त्यांनी या गोष्टी कराव्यात असा सल्ला एलआयसीने दिला आहे. 

एलआयसी आयपीओतील 10 टक्के शेअर पॉलिसीधारकांना राखीव ठेवणार आहे. यासाठी पॉलिसीधारकांना एलआयसीकडे पॅनकार्डची माहिती अपडेट करावी लागणार आहे. तसेच कोणत्याही आयपीओमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला डीमॅट अकाऊंट उघडावे लागणार आहे. यामुळे एलआयसीचे शेअर घेण्यासाठी पॉलिसीधारकांना डीमॅट अकाऊंट उघडावे लागणार आहे. या दोन गोष्टी केल्यावर एलआयसीचे शेअर पॉलिसीधारकांना घेता येणार आहेत. 

एलआसीच्या आयपीओला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. परंतू एलआयसीने त्याची तयारी सुरु केली आहे. एलआयसीने पॉलिसीधारकांना जाहिरात प्रसिद्ध करून आयपीओमध्ये शेअर घेण्यासाठी केवायसी अपडेट करण्यास सांगितले आहे. तसेच डीमॅट अकाऊंट पॉलिसीधारकांना स्वत:चे स्वत:च उघडावे लागणार आहे. यासाठी जे शुल्क लागेल त्याची जबाबदारी एलआयसीची राहणार नाही, पॉलिसीधारकांनाच हे शुल्क अदा करावे लागणार आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलेले की, एलआयसीचा आयपीओ 2021-22 मध्ये येईल. केंद्र सरकारने एलआयसीमधील आपला हिस्सा विकून 1.75 लाख कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 

संबंधित बातम्या...

Reliance Capital: धक्का बसेल! कंगाल रिलायन्स कॅपिटलमध्ये अंबानींचेच नाही, तुमचेही पैसे अडकलेत; जाणून घ्या कसे...

LIC चे मूल्यांकन डिसेंबरपर्यंत होणार; ‘या’ महिन्यात IPO येणार, मोदी सरकार १ लाख कोटी उभारणार

 

Web Title: LIC policyholders want to Purchase Shares in the IPO, have to update Pancard KYC and open demat account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.