Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC Share Listing: पहिल्याच दिवशी LIC च्या गुंतवणूकदारांना मोठा फटका, प्री-ओपनिंगमध्ये १३ टक्क्यांनी शेअर्स कोसळले

LIC Share Listing: पहिल्याच दिवशी LIC च्या गुंतवणूकदारांना मोठा फटका, प्री-ओपनिंगमध्ये १३ टक्क्यांनी शेअर्स कोसळले

lic ipo share listing : बहुप्रतिक्षीत सरकारी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ आज खुल्या बाजारात (Open Market) लिस्ट झाला आहे. पण एलआयसीची सुरुवात मात्र निराशाजनक झाल्याचं दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 10:07 AM2022-05-17T10:07:04+5:302022-05-17T10:12:23+5:30

lic ipo share listing : बहुप्रतिक्षीत सरकारी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ आज खुल्या बाजारात (Open Market) लिस्ट झाला आहे. पण एलआयसीची सुरुवात मात्र निराशाजनक झाल्याचं दिसून येत आहे.

lic ipo share listing on bse nse gmp still negative investors analysts other details | LIC Share Listing: पहिल्याच दिवशी LIC च्या गुंतवणूकदारांना मोठा फटका, प्री-ओपनिंगमध्ये १३ टक्क्यांनी शेअर्स कोसळले

LIC Share Listing: पहिल्याच दिवशी LIC च्या गुंतवणूकदारांना मोठा फटका, प्री-ओपनिंगमध्ये १३ टक्क्यांनी शेअर्स कोसळले

नवी दिल्ली-

बहुप्रतिक्षीत सरकारी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ आज खुल्या बाजारात (Open Market) लिस्ट झाला आहे. पण एलआयसीची सुरुवात मात्र निराशाजनक झाल्याचं दिसून येत आहे. ग्रे मार्केटमध्ये शून्याहून खाली प्रिमिअमवर ट्रेड केल्यानंतर एलआयसीचा शेअर बीएसईमध्ये प्री-ओपन सेशमध्ये १२ टक्क्यांहून अधिक कोसळला आहे. प्री-ओपन सेशनमध्ये एलआयसीचा शेअर पहिल्याच दिवशी सुरुवातीला १२.६० टक्क्यांनी म्हणजेच ११९.६० रुपयांच्या नुकसानीसह ८२९ रुपयांवर ट्रेंड करत आहे. 

एलआयसीचा आयपीओ भारताच्या इतिसाहासातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. या आयपीओसाठी ९०२ ते ९४९ रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. पहिल्यांदाच एखादा आयपीओ विकेंडच्या दोनही दिवशी सुरू होता. रेकॉर्ड ब्रेक ६ दिवस सुरू राहिल्यानंतर एलआयसीच्या आयपीओला जवळपास सर्वच विभागात चांगला प्रतिसाद मिळला. दरम्यान, ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओ प्रीमियम लिस्टिंगपूर्वीच शून्याहून खाली गेला आहे. ज्यामुळे पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना नुकसान होण्याचे संकेत दिसून येत आहेत. 

सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी एलआयसीच्या आयपीओच्या लिस्टिंग सोहळ्याला सुरुवात झाली. लिस्टिंग सोहळ्यात बीएसईचे सीईओ आणि एमडी आशिष कुमार चौहान, दीपम तुहिन कांत पांडे यांच्यासह एलआयसीचे अधिकारी उपस्थित होते. 

ग्रे मार्केट प्रिमियम अजूनही निगेटिव्ह
लिस्टिंगच्या पूर्वसंध्येलाच एलआयसी आयपीओचा जीएमपी शून्यापासून २५ रुपयांपर्यंत खाली कोसळला होता. आज यात थोडी सुधारणा पाहायला मिळाली पण अजूनही २० रुपये निगेटिव्हमध्ये ट्रेंड करत आहे. एक वेळ अशी आली होती की ९२ रुपयांच्या प्रिमिअमसह शेअर ट्रेड करत होता. टॉप शेअर ब्रोकरच्या आकडेवारीनुसार सध्या एलआयसी आयपीओचा ग्रे मार्केट प्रिमिअम निगेटिव्ह २० रुपयांपेक्षा कमी आहे. जीएमपीच्या या आकडेवारीवरुन अंदाज लावता येऊ शकतो की गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं. 

Web Title: lic ipo share listing on bse nse gmp still negative investors analysts other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.