Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुवर्णसंधी! मोठ्या वाढीनंतर सोने-चांदी पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

सुवर्णसंधी! मोठ्या वाढीनंतर सोने-चांदी पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

मागील सत्रात ते 51244 रुपयांवर बंद झाले होते आणि आज सकाळी 51023 रुपयांवर ते उघडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 02:42 PM2020-09-08T14:42:03+5:302020-09-08T14:42:23+5:30

मागील सत्रात ते 51244 रुपयांवर बंद झाले होते आणि आज सकाळी 51023 रुपयांवर ते उघडले.

latest rate of gold and silver mcx market | सुवर्णसंधी! मोठ्या वाढीनंतर सोने-चांदी पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

सुवर्णसंधी! मोठ्या वाढीनंतर सोने-चांदी पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

सोमवारी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली, परंतु मंगळवारी त्यात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सकाळी 10 वाजता ऑक्टोबरच्या सोन्याच्या वायदा भावात 203 रुपयांनी घसरण होऊन ते 50862 रुपयांवर आले होते. मागील सत्रात सोने 51065 रुपयांवर बंद झाले आणि आज सकाळी 50800 रुपयांवर खुले झाले. त्याचप्रमाणे डिसेंबरमध्ये सोन्याचे भाव 124 रुपयांनी घसरून 51120 रुपयांवर आले होते. मागील सत्रात ते 51244 रुपयांवर बंद झाले होते आणि आज सकाळी 51023 रुपयांवर ते उघडले. डिसेंबरच्या डिलीव्हरीसाठी चांदी 382 रुपयांनी घसरून 67889 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. मागील सत्रात चांदी 68271 रुपयांवर बंद झाली आणि आज सकाळी 67799 रुपयांवर खुली झाली.

सराफा बाजाराची स्थिती
दिल्ली सराफा बाजारात रुपयाच्या घसरणीमुळे सोमवारी सोन्याचा भाव 258 रुपयांनी वाढून 51,877 रुपयांवर आला. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली. मागील सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 51,619 रुपयांवर बंद झाला होता. चांदीदेखील 837 रुपयांनी वाढून 69,448 रुपये प्रतिकिलो झाली, जी यापूर्वी 68,611 रुपये प्रतिकिलो होती. सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 21 पैशांनी घसरून 73.35च्या पातळीवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व चांदी अनुक्रमे 1,932 डॉलर प्रति औंस आणि 26.93 डॉलर प्रति औंसवर बंद झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, “सोमवारी अमेरिकन बाजारात व्यवहार न झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली.” मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले, सोमवारी आशियाई सत्रामध्ये सोन्याचा अपरिवर्तित व्यवहार झाला आणि 'कामगार दिना'च्या सुट्टीमुळे अमेरिकन बाजार बंद राहिल्याने किमतीतील चढ-उतार कमी राहिले.

एका महिन्यात सोने 5500 रुपयांनी स्वस्त झाले
गेल्या महिन्यात 7 ऑगस्टला सोन्याने फ्युचर्स मार्केटमधील उच्चांकाची पातळी गाठली आणि दर दहा ग्रॅमची किंमत वाढून 56,200 रुपये झाली. त्यानंतर महिन्याभरात सोन्याच्या किमती सुमारे 5500 रुपयांनी खाली आल्या. म्हणजेच एका महिन्यात सोन्याची किंमत दहा टक्क्यांनी घसरली. म्हणजेच सोन्याच्या किमतींमध्ये एवढी घसरण झाली आहे की ही सोन्याची खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

Web Title: latest rate of gold and silver mcx market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.