Lokmat Money > बिझनेस न्यूज > आजवरची सर्वाधिक गुंतवणूक मुंबईतील प्रकल्पांवर; बांधकाम क्षेत्रातील खासगी भांडवल घटले

आजवरची सर्वाधिक गुंतवणूक मुंबईतील प्रकल्पांवर; बांधकाम क्षेत्रातील खासगी भांडवल घटले

अहवालातील निष्कर्ष;

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 07:06 AM2020-10-17T07:06:54+5:302020-10-17T07:07:03+5:30

अहवालातील निष्कर्ष;

The largest investment to date has been on projects in Mumbai; Private capital in the construction sector declined | आजवरची सर्वाधिक गुंतवणूक मुंबईतील प्रकल्पांवर; बांधकाम क्षेत्रातील खासगी भांडवल घटले

आजवरची सर्वाधिक गुंतवणूक मुंबईतील प्रकल्पांवर; बांधकाम क्षेत्रातील खासगी भांडवल घटले

मुंबई : बांधकाम व्यवसायात गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत ३ लाख ९० हजार कोटींच्या खासगी भागभांडवलाची गुंतवणूक झाली होती. यंदा त्यात घट झाली असून हे भांडवल १ लाख ६९ हजार ३०८ कोटींपर्यंत कमी झाले.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक ८१ टक्के भांडवल हे कार्यालयीन बांधकामांसाठी गुंतविण्यात आले. रिटेल व्यवसायात शून्य गुंतवणूक झाली आहे. नाइट फ्रँक या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती हाती आली. आजवरची सर्वाधिक गुंतवणूक मुंबईतील प्रकल्पांवर झाली आहे. गेल्या वर्षी निवासी क्षेत्रासाठी ७१७ दशलक्ष डॉलर्स भांडवल होते. ते यंदा ५६९ कोटींपर्यंत कमी झाले. कार्यालयीन बांधकामांचे भांडवल २,७२५ दशलक्ष डॉलर्सवरून १८७१ इतके कमी झाले. वेअरहाउसिंग क्षेत्र विस्तारत असले तरी त्यातील गुंतवणूक १८९४ दशलक्ष डॉलर्सवरून १५३७ इतकी कमी झाली. रिटेल क्षेत्रात गतवर्षी ३९७ दशलक्ष डॉलर्सचे भाडंवल होते. यंदा त्या आघाडीवर एकही व्यवहार झालेला नाही.

आर्थिक मंदीमुळे ज्या क्षेत्रात जास्त विकास होण्याची क्षमता आहे तेथे जास्त भागभांडवल गुंतविण्याकडे कल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कार्यालयीन बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक जास्त असल्याचे निरीक्षण नाइट फ्रँकचे अध्यक्ष शिरीष बैजल यांनी नोंदविले.

रिटेल व्यवसायाला फटका
कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक फटका रिटेल व्यवसायाला बसला. अनेक मॉल बंद पडले. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसते.

Web Title: The largest investment to date has been on projects in Mumbai; Private capital in the construction sector declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.