Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोठी बातमी! कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना मोदी सरकार अर्धा पगार देणार

मोठी बातमी! कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना मोदी सरकार अर्धा पगार देणार

कोरोना संकटाच्या वेळी बेरोजगार औद्योगिक कामगारांसाठी अटल विमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत(Atal Beemit Vyakti Kalyan Yojana) सवलत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 08:41 AM2020-09-13T08:41:17+5:302020-09-13T08:41:32+5:30

कोरोना संकटाच्या वेळी बेरोजगार औद्योगिक कामगारांसाठी अटल विमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत(Atal Beemit Vyakti Kalyan Yojana) सवलत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

labour ministry paves way for 50 percent unemployment benefit to esic subscribers | मोठी बातमी! कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना मोदी सरकार अर्धा पगार देणार

मोठी बातमी! कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना मोदी सरकार अर्धा पगार देणार

कोरोना संकटात बेरोजगारांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अटल विमा व्यक्ती कल्याण योजनें(Atal Beemit Vyakti Kalyan Yojana)अंतर्गत सामान्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाला सरकारने अधिसूचित केले आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळात बेरोजगारांना आधार मिळाला आहे. कोरोना संकटाच्या वेळी बेरोजगार औद्योगिक कामगारांसाठी अटल विमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत(Atal Beemit Vyakti Kalyan Yojana) सवलत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. याद्वारे कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन (ESIC)मध्ये नोंदणीकृत कामगारांना 50% बेरोजगारीचा लाभ मिळेल. सरकारच्या या निर्णयाचा 40 लाखांहून अधिक कामगारांना फायदा होणार आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)च्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूमुळे देशातील सुमारे 12 कोटी लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बेरोजगार आहेत. यापैकी कारखान्यात काम करणार्‍यांची संख्या सुमारे 19 दशलक्ष आहे. एकट्या जुलै महिन्यातच 50 लाख लोक बेरोजगार झाले. अशा परिस्थितीत कोरोनामुळे कारखान्यात काम करणा-या लोकांना दिलासा मिळाल्याची बातमी आहे. कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना तीन महिन्यांसाठी पगाराच्या पन्नास टक्के बेरोजगार लाभ देण्यात येईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे. या वर्षाच्या 24 मार्च ते 31 डिसेंबरदरम्यान ज्यांनी नोकर्‍या गमावल्या आहेत, त्यांना हा लाभ देण्यात येईल. सरकारच्या या निर्णयामुळे आता साथीच्या काळात नोकरी गमावलेल्यांना बेरोजगारी भत्ता मिळणार आहे.

ESIC कामगारांना ही सुविधा दिली जाईल. ते तीन महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के हक्क सांगू शकतात. पूर्वी ही मर्यादा 25% होती. अटल विमा व्यक्ती कल्याण योजना ESICद्वारा संचालित योजना आहे. 1 जुलै 2020 पासून या योजनेस एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, ती 30 जून 2021पर्यंत लागू राहील. या मूळ तरतुदी 1 जानेवारी 2021 पासून पुनर्संचयित केल्या जातील. या योजनेचा फायदा 41,94,176 कामगारांना होईल. 6710.68 कोटी रुपयांचा भार ESICवर असेल. ESIC कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत एक संस्था आहे जी 21,000 रुपयांपर्यंत पगार घेणार्‍या लोकांना ईएसआय योजनेंतर्गत विमा प्रदान करते. कोरोना संकटात बेरोजगार कामगारांना ESIC शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. पडताळणीनंतर ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल. यासाठी कारखान्यात काम करणा-या बेरोजगारांचा आधार क्रमांक घेतला जाईल आणि हक्काचा दावा सांगितल्यास त्यांना 50 टक्के पगार दिला जाईल.
 

Web Title: labour ministry paves way for 50 percent unemployment benefit to esic subscribers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.