Lokmat Money > बिझनेस न्यूज > जाणून घ्या, तुमची बँक डबघाईला आली तर तुम्हाला पैसे मिळणार की नाही?

जाणून घ्या, तुमची बँक डबघाईला आली तर तुम्हाला पैसे मिळणार की नाही?

पुढील सहा महिने खातेदार १० हजारांपेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढू शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 03:47 PM2019-09-29T15:47:40+5:302019-09-29T15:48:55+5:30

पुढील सहा महिने खातेदार १० हजारांपेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढू शकणार नाही

Know How Safe Is Your Money In Bank | जाणून घ्या, तुमची बँक डबघाईला आली तर तुम्हाला पैसे मिळणार की नाही?

जाणून घ्या, तुमची बँक डबघाईला आली तर तुम्हाला पैसे मिळणार की नाही?

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले. आर्थिक अनियमिततेतचं कारण देत आरबीआयने ही कारवाई केली. मात्र या कारवाईमुळे सर्वसामान्य खातेदारांना त्रास झाला. पुढील सहा महिने खातेदार १० हजारांपेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढू शकणार नाही. पीएमसी बँक ग्राहकांसोबत जे झालं त्याचा धडा इतर लोकांनीही घेतला पाहिजे. त्यामुळे जाणून घ्या, तुमचे पैसे तुम्हाला बँकेतून मिळणार की नाही?

१ लाख रुपयांची गॅरंटी
सरकारी, खासगी, परदेशी अथवा सहकारी कोणतीही बँक असो यामध्ये जमा पैशांवर सिक्युरिटी डिपोजिट इंशुरन्स क्रेडिट गॅरंटी डीआयसीजीसीकडून उपलब्ध केली जाते. यासाठी तुम्हाला बँकेत प्रिमियम भरावा लागतो. तुमच्या बँक खात्यात कितीही रक्कम जमा असू द्या, गॅरंटी फक्त १ लाख रुपयांपर्यंत असते. 

इतकचं नाही तर जर तुमचं एकापेक्षा अधिक बँकेत खाते असेल, एफडी असेल तर बँकेवर निर्बंध आले अथवा बँक बुडली तरी तुम्हाला १ लाख रुपयांची गॅरंटी दिली जाते. ही रक्कम कशी मिळणार याचे मार्गदर्शक तत्वं डीआयसीजीसी निश्चित करते. हे १ लाख किती दिवसात मिळणार याला वेळेचे बंधन नाही. 
असे ठेवा पैसे सुरक्षित 

१) सहकारी बँकांना प्रश्न विचारा 
सहकारी बँकेकडून अधिकचे व्याज मिळत असल्याने लोक त्याकडे आकर्षिक होतात. सहकारी बँकेतील ठेवी, एफडी आणि योजनांवर इतर बँकांपेक्षा जास्त व्याज दिलं जातं. त्यामुळे सहकारी बँकांना तुम्ही इतर बँकांपेक्षा अधिक व्याज का देता? असा प्रश्न विचारा, त्यांची वेबसाइट चेक करा, काही शंका आल्यास त्याठिकाणाहून पैसे काढून द्या. सहकारी बँका ज्या कंपन्यात पैसे गुंतवणूक करतात. त्या कंपन्यांची मार्केटमध्ये स्थिती काय आहे? त्याचा फायदा किती नुकसान किती? याची माहिती द्या. 

२) गुंतवणुकीसाठी पर्याय निवडा
बँकेत एफडी आणि अथवा दुसऱ्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर ते पैसे SIP च्या माध्यमातून इक्विटी शेअर मार्केट, मॅच्युअल फंड यामध्ये गुंतवावेत. 

३) सावधानता बाळगा
तुमच्या जीवनातील बचत कधीही एका बँकेत ठेवू नका, वेगवेगळ्या बँकेत हे पैसे बचत करावे. त्यामुळे बँक डबघाईला आली तरी तुम्हाला जास्त नुकसान सहन करावं लागणार नाही. 

जर तुमचं एखाद्या बँकेत वैयक्तिक खाते असेल आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत जॉईंट अकाऊंट असेल तर ज्यावेळी बँक डबघाईला येते त्यावेळी आपल्याला २ लाख मिळतील. मात्र त्यासाठी तुमच्या जॉईंट अकाऊंटमध्ये पहिलं नावं दुसऱ्या व्यक्तीचं असायला हवं. 
भारतात कधीही बँक डबघाईला आल्याची परिस्थिती निर्माण झाली तर एका बँकेला दुसऱ्या बँकेत विलीनीकरण केले जाते. त्यामुळे ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतात. यावेळी नवी बँक ग्राहकांच्या पैशांची हमी घेते. 
 

Web Title: Know How Safe Is Your Money In Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.