Lokmat Money > बिझनेस न्यूज > DRDO मध्ये नोकरीची संधी, कुठल्याही परीक्षेशिवाय थेट मुलाखतीतून होणार भरती

DRDO मध्ये नोकरीची संधी, कुठल्याही परीक्षेशिवाय थेट मुलाखतीतून होणार भरती

 या भरतीप्रक्रियेसाठी काढलेल्या नोटिफिकेशननुसार डीआरडीओकडून ज्युनिअर रिसर्च फेलोच्या चार पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 10:38 AM2020-07-30T10:38:27+5:302020-07-30T12:59:47+5:30

 या भरतीप्रक्रियेसाठी काढलेल्या नोटिफिकेशननुसार डीआरडीओकडून ज्युनिअर रिसर्च फेलोच्या चार पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Job opportunities in DRDO, Recruitment will be through direct interview without any examination | DRDO मध्ये नोकरीची संधी, कुठल्याही परीक्षेशिवाय थेट मुलाखतीतून होणार भरती

DRDO मध्ये नोकरीची संधी, कुठल्याही परीक्षेशिवाय थेट मुलाखतीतून होणार भरती

नवी दिल्ली - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मध्ये थेट भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमधून ज्युनिअर रिसर्च फेलो ( जेआरएफ) च्या पदांवर भरती केली जाणार आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार या भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षेचे आयोजन केले जाणार नाही, तर थेट मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.

 या भरतीप्रक्रियेसाठी काढलेल्या नोटिफिकेशननुसार डीआरडीओकडून  ज्युनिअर रिसर्च फेलोच्या चार पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३१ हजार रुपये स्टायपेंड मिळेल. त्याशिवाय डीआरडीओ नियमांनुसार एचआरएसुद्धा देण्यात येईल.

अशी आहे पात्रता, वयोमर्यादा आणि भरती प्रक्रिया

भरतीसाठीची वयोमर्यादा २८ ऑगस्ट असून, २८ वर्षांपर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. मात्र आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमानुसार सुट मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना डीआरडीओच्या  https://drdo.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर नोटिफिकेशनप्रमाणे अर्ज भरावा लागेल. नोटिफिकेशनमध्ये मागवण्यात आलेल्या कागदपत्रांसह मुलाखतीसाठी निर्धारित ठिकाणी पोहोचावे लागेल.

 ज्युनिअर रिसर्च फेलोच्या या चार पदांसाठी ६ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मुलाखती होतील.

इतर महत्त्वाच्या बातम्या

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

Web Title: Job opportunities in DRDO, Recruitment will be through direct interview without any examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.