Lokmat Money > बिझनेस न्यूज > ना मोबाइल, ना बंगला, ना व्यवसाय; अत्यंत साधेपणानं आयुष्य जगताहेत Ratan Tata यांचे बंधू

ना मोबाइल, ना बंगला, ना व्यवसाय; अत्यंत साधेपणानं आयुष्य जगताहेत Ratan Tata यांचे बंधू

टाटा समुहाचं (TATA Group) नाव उंचावणारे रतन टाटा (Ratan Tata) यांना सर्वच ओळखतात. परंतु त्यांचे बंधू जिमी टाटा (Jimmy Tata) यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहित असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 10:34 AM2022-01-20T10:34:46+5:302022-01-20T10:35:49+5:30

टाटा समुहाचं (TATA Group) नाव उंचावणारे रतन टाटा (Ratan Tata) यांना सर्वच ओळखतात. परंतु त्यांचे बंधू जिमी टाटा (Jimmy Tata) यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहित असेल.

jimmy tata meet the low profile brother of ratan tata know about his personal life what he do | ना मोबाइल, ना बंगला, ना व्यवसाय; अत्यंत साधेपणानं आयुष्य जगताहेत Ratan Tata यांचे बंधू

ना मोबाइल, ना बंगला, ना व्यवसाय; अत्यंत साधेपणानं आयुष्य जगताहेत Ratan Tata यांचे बंधू

टाटा सन्सचे (Tata Sons) अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हे देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक आहेत. देश-विदेशात त्यांचं नाव आहे. पण त्याचे धाकटे बंधू जिमी टाटा (Jimmy Tata) यांचे नाव फार कमी लोकांना माहीत असेल. ते रतन टाटा यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत आणि मुंबईतील कुलाबा येथे दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहतात. रतन टाटा यांच्याप्रमाणेच जिमी टाटादेखील बॅचलर आहेत. जिमी टाटा हे कायमच प्रसिद्धीपासून दूर राहतात. यामुळे त्यांचा अनेकांना परिचय नाही.

उद्योगपती हर्ष गोएंका (businessman Harsh Goenka) यांनी बुधवारी त्यांच्याबद्दल एक ट्वीट केलं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये जिमी टाटा यांचा फोटो शेअर करत एक माहितीही लिहिली. "तुम्हाला जिमी टाटा, मुंबईतील कुलाबा येथे दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहणारे रतन टाटा यांचे धाकटे बंधू माहीत आहेत का? त्यांना व्यवसायात कधीच रस नव्हता. ते एक चांगले स्क्वॉशपटू आहेत आणि प्रत्येक वेळी मला खेळात हरवतात. टाटा समूहाप्रमाणेच तेदेखील प्रसिद्धीपासून दूर राहतात," असं गोएंका म्हणाले.


मोबाइलही नाही
जिमी टाटा हे रतन टाटा यांनी छोटे बंधू आहेत. त्यांनी ९० च्या दशकात निवृत्त होण्यापूर्वी टाटा समुहाच्या अनेक कंपन्यांमध्ये काम केलं. ते टाटा सन्स आणि अन्य टाटांच्या कंपन्यांमध्ये शेअर होल्डर आहेत. याशिवाय ते सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टीही आहेत. रिपोर्ट्सनुसार ते आपल्याकडे कधीच मोबाईल ठेवत नाहीत, तसचं वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते जगभरातील माहिती घेत असतात. तसंच टाटा समुहात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवरही ते लक्ष ठेवतात.

Web Title: jimmy tata meet the low profile brother of ratan tata know about his personal life what he do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.