Lokmat Money > बिझनेस न्यूज > IRCTC Bus Booking Service: आता आयआरसीटीसी देशभरातील बस तिकिटे देखील बुक करणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

IRCTC Bus Booking Service: आता आयआरसीटीसी देशभरातील बस तिकिटे देखील बुक करणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

IRCTC Bus Booking Service: आयआरसीटीसीने बस बुकिंग फीचरसाठी एक नवीन लोगो जारी केला आहे. कोरोना विषाणूच्या कमी प्रकरणांमुळे, या प्लॅटफॉर्मवरून बसच्या बुकिंगला गती मिळण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 09:07 PM2021-10-11T21:07:17+5:302021-10-11T21:07:34+5:30

IRCTC Bus Booking Service: आयआरसीटीसीने बस बुकिंग फीचरसाठी एक नवीन लोगो जारी केला आहे. कोरोना विषाणूच्या कमी प्रकरणांमुळे, या प्लॅटफॉर्मवरून बसच्या बुकिंगला गती मिळण्याची शक्यता आहे.

IRCTC Bus Booking Service: Now IRCTC will also book bus tickets across the country, find out the whole process ... | IRCTC Bus Booking Service: आता आयआरसीटीसी देशभरातील बस तिकिटे देखील बुक करणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

IRCTC Bus Booking Service: आता आयआरसीटीसी देशभरातील बस तिकिटे देखील बुक करणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

IRCTC Bus Booking Service: भारतीय रेल्वेने (Indian Railways) आपल्या ग्राहकांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. आयआरसीटीसीने ट्यूरिझम पोर्टलसह (IRCTC Tourism Portal) बस बुकिंग इंटिग्रेट केले आहे. आता ग्राहक आयआरसीटीसीच्या ट्यूरिझम पोर्टल www.bus.irctc.co.in वरून किंवा आयआरसीटीसीच्या रेल कनेक्ट अॅपद्वारे बस बुक करू शकतात. ही सेवा जानेवारी 2021 मध्ये सुरू करण्यात आली होती, परंतु कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यावर पुढे काम होऊ शकले नाही. (Irctc Integrates Bus Booking On Its Tourism Portal, Know How To Book Ticket)

आयआरसीटीसीने बस बुकिंग फीचरसाठी एक नवीन लोगो जारी केला आहे. कोरोना विषाणूच्या कमी प्रकरणांमुळे, या प्लॅटफॉर्मवरून बसच्या बुकिंगला गती मिळण्याची शक्यता आहे. सध्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 50 हजारांहून अधिक बसेसची बुकिंग सुविधा उपलब्ध होईल, ज्यात शासकीय आणि खाजगी दोन्ही बसचा समावेश आहे. या सेवेअंतर्गत 22 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सेवा पुरवली जाणार आहे.

बस तिकिट बुकिंगची प्रक्रिया...
- बस तिकिट बुकिंगसाठी www.bus.irctc.co.in ला भेट द्या.
- तुम्हाला कुठून कुठे प्रवास करायचा आहे, ती दोन्ही ठिकाणे निर्धारित स्पेसमध्ये द्या.
- प्रवासाची तारीख निवडा आणि सर्च वर क्लिक करा.
- यानंतर, तुम्हाला त्या मार्गावर उपलब्ध बसचे पर्याय, प्रवासाचा कालावधी, बस चालवण्याचा आणि डेस्टिनेशनवर पोहोचण्याची वेळ सादर केली जाईल. 
- याशिवाय, तिकिटाची किंमत आणि किती जागा बुक करायच्या बाकी आहेत, याचे डिटेल्सही दिसतील.
- प्रवासी सीटर, स्लीपर, एसी आणि नॉन-एसी बस निवडू शकतात. सीट निवड आणि बोर्डिंग/ड्रॉपिंग पॉईंट्स देखील सिलेक्ट केले जाऊ शकते.
- सीट निवडल्यानंतर प्रोसीड टू बुक वर क्लिक करा. येथे तुम्हाला IRCTC चे लॉगिन किंवा गेस्ट युजर म्हणून लॉगिन करावे लागेल.
- यानंतर, तिकिटाची किंमत भरल्यानंतर आणि इतर काही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बसचे तिकीट ऑनलाइन बुक केले जाईल.

बँका आणि ई-वॉलेटद्वारे मिळेल सूट
प्रवाशांसाठी बस मार्ग, सुविधा, आढावा, रेटिंग आणि फोटो उपलब्ध असतील. याच्या आधारे प्रवासी त्यांच्या आवडीची बस निवडू शकतील. प्रवासी बस प्रवासासाठी पिकअप आणि ड्रॉप पॉईंट्स आणि वेळेची निवड करू शकतील आणि वाजवी दरात बसचे तिकीट बुक करू शकतील. आयआरसीटीसीच्या ऑनलाईन बस तिकीट बुकिंगवर बँका आणि ई-वॉलेटद्वारे सूट देखील उपलब्ध असेल.
 

Web Title: IRCTC Bus Booking Service: Now IRCTC will also book bus tickets across the country, find out the whole process ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.