Invalid telephone exchange case: Maran brothers' plea rejected | अवैध टेलिफोन एक्स्चेंज प्रकरण : मारन बंधूंची  याचिका फेटाळली
अवैध टेलिफोन एक्स्चेंज प्रकरण : मारन बंधूंची  याचिका फेटाळली

चेन्नई - दशक भरापूर्वीच्या अवैध  टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने  निश्चित केलेल्या आरोपांविरु द्ध
दयानिधी आणि क लानिधी मारन या बंधूद्वयाची याचिक ा मद्रास उच्च न्यायालयानेबुधवारी फेटाळली. माजी केंद्रीय मंत्री असलेल्या
दयानिधी मारन यांना द्रमुक क डून मध्य चेन्नई मतदारसंघातील लोक सभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय द्रमुक लाही धक्क ा देणारा ठरला आहे. क लानिधी मारन हे सन टीव्ही नेटवर्कचे चेअरमन आहेत.
न्या. एन. आनंद वंके टेश यांनी मारन बंधूंची याचिक ा फेटाळून लावतानाच या प्रक रणाची सुनावणी चार महिन्यांत पूर्ण क रण्याचे आदेश विशेष न्यायालयास दिले. ३० जानेवारी रोजी विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश वासंती यांनी मारन बंधूंवर भा.दं.वि. क लम १२० (ब) (गुन्हेगारी क ट), ४०९ (गुन्हेगारी विश्वासघात), ४६७, ४७१ आणि ४७७ तसेच पीसी क ायदा क लम १३ (२), १३(१)(सी) १३(१)(डी) अन्वये आरोप निश्चित केले होते. विशेष न्यायालयातील सुनावणीच्या वेळी दयानिधी मारन हे स्वत: न्यायालयात हजर होते. त्यांनी
सांगितले क ी, हे संपूर्ण प्रक रण राजक ीय हेतूने प्रेरित आहे. आपण मंत्रीपदाच्या अधिक ारांचा गैरवापर केल्याचा क ोणताही पुरावा
सीबीआयक डेनाही. क लानिधी मारन हेही न्यायालयात हजर होते. त्यांनी सांगितले क ी, ६ हजार पानांच्या आरोपपत्रात आपल्या नावाचा एक ा ओळीचाही उल्लेख नाही. केवळ आपल्या भावामुळे आपल्याला या प्रक रणात गोवण्यात आले. (वृत्तसंस्था)

१.७८ कोटी रुपयांचे झाले होते नुक सान
 सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दयानिधी मारन यांनी केंद्रीय मंत्री असताना आपल्या निवासस्थानी अवैधरीत्या खाजगी टेलिफ ोन एक्स्चेंज उभारले होते. त्याचा वापर सन टीव्हीसाठी क रण्यात आला. त्यातून सरक ारला १.७८ क ोटी रु पयांचे नुक सान झाले.


Web Title:  Invalid telephone exchange case: Maran brothers' plea rejected
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.