Lokmat Money > बिझनेस न्यूज > ओमायक्राॅनच्या निर्बंधांवर उद्याेगजगताची नाराजी, अनेकांच्या साेशल मीडियावर प्रतिक्रिया

ओमायक्राॅनच्या निर्बंधांवर उद्याेगजगताची नाराजी, अनेकांच्या साेशल मीडियावर प्रतिक्रिया

Coronavirus: काेराेनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनमुळे जगाची चिंता  वाढली आहे. भारताने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी  नियमावली लागू केली आहे. काेराेनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत प्रत्येक वेळी लागू हाेणारे नवे निर्बंध आणि नियमांमुळे उद्याेगजगतही नाराज झाले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 10:10 AM2021-12-01T10:10:06+5:302021-12-01T10:13:05+5:30

Coronavirus: काेराेनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनमुळे जगाची चिंता  वाढली आहे. भारताने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी  नियमावली लागू केली आहे. काेराेनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत प्रत्येक वेळी लागू हाेणारे नवे निर्बंध आणि नियमांमुळे उद्याेगजगतही नाराज झाले आहे. 

Industry outraged over Omycran's ban, many react on social media | ओमायक्राॅनच्या निर्बंधांवर उद्याेगजगताची नाराजी, अनेकांच्या साेशल मीडियावर प्रतिक्रिया

ओमायक्राॅनच्या निर्बंधांवर उद्याेगजगताची नाराजी, अनेकांच्या साेशल मीडियावर प्रतिक्रिया

 नवी दिल्ली : काेराेनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनमुळे जगाची चिंता  वाढली आहे. भारताने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी  नियमावली लागू केली आहे. काेराेनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत प्रत्येक वेळी लागू हाेणारे नवे निर्बंध आणि नियमांमुळे उद्याेगजगतही नाराज झाले आहे. 
ओमायक्राॅनचा धाेका पाहून केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली. संपूर्ण लसीकरण झाले असले तरीही प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. तसेच धाेकादायक श्रेणीतील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवसांपर्यंत विमानतळावरच थांबावे लागणार आहे. या नियमांवर उद्याेग जगतातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  अनेकांनी सतत लागू हाेणाऱ्या नव्या नियमांबद्दल साेशल मीडियाच्या माध्यमातून नाराजीही व्यक्त केली आहे.

काेटक महिंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय काेटक यांनी साेशल मीडियाला सांगितले, की ओमायक्राॅन आज भीती दाखवत आहे. उद्या वेगळा व्हेरिएंट भीती दाखवेल. बाजारपेठ आणि काेणतीही आकडेवारी न बघता आपत्ती व्यवस्थापनासाठी जगभरातील लाेक नियम बनवतील. आपण राहताे त्यात कधीही सामान्य न हाेणाऱ्या विश्वात आपले स्वागत आहे, असे काेटक यांनी लिहिले.
- उदय काेटक, एमडी, काेटक महिंद्र बँक 

ओमायक्राॅनमुळे बाजारपेठेतील उतारचढावांकडे 
लक्ष वेधताना महिंद्र आणि महिंद्रचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी सांगितले, की बदलांनुसार बाजार नाचतील आणि पुन्हा वाढतील.
- आनंद महिंद्र, अध्यक्ष महिंद्र आणि महिंद्र 

बायाे- काॅनच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मजूमदार शाॅ यांनी नव्या नियमांबाबत नाराजी व्यक्त करताना प्रश्न उपस्थित केला, की धाेकादायक श्रेणीतील देशांमधून निगेटिव्ही आरटी-पीसीआर चाचणी अहवाल आणि लसींचे दाेन्ही डाेस घेतलेल्या प्रवाशांना गृहविलगीकरणात पाठविण्याची कारवाई कठाेर नाही का? आपण फालतू नियमांना लागू हाेऊ द्यावे का? ओमायक्राॅनची लक्षणे डेल्टा व्हेरिएंटपेक्षा साैम्य आहेत, असे शाॅ यांनी सांगितले.
- किरण मजूमदार शाॅ, 
कार्यकारी अध्यक्ष, बायाेकाॅन

Web Title: Industry outraged over Omycran's ban, many react on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.