Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना धक्का, देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घसरण 

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना धक्का, देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घसरण 

विविध क्षेत्रात आलेल्या मरगळीमुळे देशावरील मंदीचे सावट गडद होत असतानाचा आर्थिक आघाडीवरून अजून एक चिंताजनक बातमी आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 05:54 PM2019-08-30T17:54:44+5:302019-08-30T17:58:49+5:30

विविध क्षेत्रात आलेल्या मरगळीमुळे देशावरील मंदीचे सावट गडद होत असतानाचा आर्थिक आघाडीवरून अजून एक चिंताजनक बातमी आली आहे.

India's GDP growth drop by 5 percent | मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना धक्का, देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घसरण 

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना धक्का, देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घसरण 


नवी दिल्ली - विविध क्षेत्रात आलेल्या मरगळीमुळे देशावरील मंदीचे सावट गडद होत असतानाचा आर्थिक आघाडीवरून अजून एक चिंताजनक बातमी आली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी घटून पाच टक्क्यांवर आला आहे. गेल्या सहा वर्षांतील जीडीपीच्या वाढीचा हा निचांक आहे. जीडीपीच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली घट हा मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का मानला जात आहे. 

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा (एप्रिल ते जून) जीडीपीचा आकडा समोर आला असून, या काळात देशाच्या जीडीपीची वाढ घटून पाच टक्क्यांवर आली आहे. गतवर्षी याच काळात जीडीपीमध्ये 8.2 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली होती. जीडीपीच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवरील संकट अधिकच गहिरे झाले आहे. 

Web Title: India's GDP growth drop by 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.