Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताचा जीडीपी ९ टक्क्यांनी घसरणार, ‘एस अ‍ॅण्ड पी’ चा अंदाज

भारताचा जीडीपी ९ टक्क्यांनी घसरणार, ‘एस अ‍ॅण्ड पी’ चा अंदाज

गेल्याच आठवड्यात फिच आणि मूडीजया पतमापन संस्थांनी देशाच्या जीडीपीमध्ये अनुक्रमे १४.८ व ११.५ टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 02:48 AM2020-09-15T02:48:17+5:302020-09-15T06:54:38+5:30

गेल्याच आठवड्यात फिच आणि मूडीजया पतमापन संस्थांनी देशाच्या जीडीपीमध्ये अनुक्रमे १४.८ व ११.५ टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

India's GDP is expected to fall by 9 per cent, S&P estimates | भारताचा जीडीपी ९ टक्क्यांनी घसरणार, ‘एस अ‍ॅण्ड पी’ चा अंदाज

भारताचा जीडीपी ९ टक्क्यांनी घसरणार, ‘एस अ‍ॅण्ड पी’ चा अंदाज

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रसारामुळे एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) चालू आर्थिक वर्षामध्ये ९ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पुअर या जागतिक पतमापन संस्थेने वर्तविला आहे. साथीच्या रोगामुळे नागरिक हातचे राखून खर्च करीत आहेत. दुसरीकडे कंपन्यांनी गुंतवणूक कमी केली असून, मागणीही घटली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात जीडीपी घसरणार असल्याचे सांगण्यात येते.
एस अ‍ॅण्ड पीने यापूर्वी जीडीपीमध्ये ५ टक्के घट होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे.गेल्याच आठवड्यात फिच आणि मूडीजया पतमापन संस्थांनी देशाच्या जीडीपीमध्ये अनुक्रमे १४.८ व ११.५ टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
एप्रिल ते जून २०२० या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी तब्बल २३.९ टक्क्यांनी घटला आहे. जी-२० देशातील ही नीचांकी कामगिरी आहे. या कालखंडामध्ये ग्राहकांकडून मागणीमध्ये २६.७ टक्क्यांनी घट झाली असून, खासगी गुंतवणूक तब्बल ४७.१ टक्क्यांनी घटली आहे. विविध कल्याणकारी योजनांवर खर्च झाल्याने ही घट काही प्रमाणात कमी झाली.
देशात सर्वत्र झालेल्या पावसामुळे कृषी क्षेत्राने मात्र चांगली कामगिरी केली आहे.
देशामध्ये जून महिन्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्याने अर्थचक्र पुन्हा सुरु झाले आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. देशात ११ सप्टेंबरपूर्वीच्या सप्ताहात दररोज सरासरी ९० हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे.

...तरच पुढील आर्थिक वर्ष चांगले जाईल
पुढील आर्थिक वर्षामध्ये १० टक्के वाढ नोंदविणे शक्य आहे. नागरिकांनी आता पैैसा हातात राखणे पसंत केले आहे. कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे सध्याच्या स्थितीत बदल होईल. मात्र, त्यासाठी सरकारी धोरणकर्त्यांनी पुन्हा व्यापक स्वरूपाचा लॉकडाऊन न करणे श्रेयस्कर राहील.

Web Title: India's GDP is expected to fall by 9 per cent, S&P estimates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.