Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सुधारतेय; नोमुराचा अहवाल

भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सुधारतेय; नोमुराचा अहवाल

व्यवसाय पुनर्प्रारंभ निर्देशांक सुधारला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 01:07 AM2020-08-12T01:07:54+5:302020-08-12T01:08:13+5:30

व्यवसाय पुनर्प्रारंभ निर्देशांक सुधारला

indias economy is slowly recovering shows nomura india business resumption index | भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सुधारतेय; नोमुराचा अहवाल

भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सुधारतेय; नोमुराचा अहवाल

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याच्या गतीत मागील आठवड्यात सुधारणा झाली असल्याची माहिती नोमुराने जारी केलेल्या एका अहवालात देण्यात आली आहे.

९ आॅगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात ‘नोमुरा इंडिया बिझनेस रेसुम्प्शन इंडेक्स’ (एनआयबी-आरआय) वाढून ७१.८ अंकांवर पोहोचला. त्या आधीच्या सलग तीन आठवड्यांत तो ७० अंकांवर होता. एनआयबीआरआय निर्देशांकात व्यवसायांच्या पुनर्प्रारंभाचा दर मोजला जातो. प्रत्येक आठवड्याला आर्थिक घडामोडी सामान्य स्थितीत येण्याची गती त्यात मोजली जाते.

नोमुराने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, गुगलचा रिटेल अ‍ॅण्ड रिक्रिएशन मॉबिलिटी इंडेक्स आणि अ‍ॅपलचा ड्रायव्हिंग इंडेक्स लक्षणीयरीत्या वाढत आहे.

गुगलची कार्यालयीन गतिशीलता मात्र आणखी वाईट झाली आहे. श्रम सहभागीता दर वाढून ४०.०६ टक्के झाला आहे. मागील आठवड्यात तो ४०.५ टक्के होता. बेरोजगारीचा दर मात्र वाढून ८.७ टक्के झाला आहे. आदल्या सप्ताहात तो ७.२ टक्के होता. वीज मागणी सुमारे ०.८ टक्क्याने घसरली आहे.

आदल्या आठवड्यातील-२ टक्क्यांच्या तुलनेत मात्र हा दर सुधारणा दर्शवित आहे.

जूनच्या मध्यावर झाली वाढ
नोमुराने म्हटले की, काही घटकांच्या बाबतीत एनआयबीआरआय प्रतिकूल असला तरी साथपूर्व काळाच्या तुलनेत सर्वसमावेशक पातळीवर तो ३० आधार अंकांची वाढ दर्शवित आहे. जुलैमधील डाटा असमान सुधारणा दर्शवित होता. नियंत्रित मागणीचे प्रतिबिंब त्यात दिसून येत होते. ग्रामीण भागातील मागणी मात्र तुलनेने चांगली दिसून आली. लॉकडाऊनमुळे एप्रिलच्या अखेरीस ४५ अंकांवर असलेला एनआयबीआरआय जूनच्या मध्यात एकदम उसळून ७०.५ अंकांवर गेला होता.

Web Title: indias economy is slowly recovering shows nomura india business resumption index

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.