Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीयांनी विदेशी प्रवासावर खर्च केले विक्रमी परकीय चलन

भारतीयांनी विदेशी प्रवासावर खर्च केले विक्रमी परकीय चलन

भारतीय लोक आंतरराष्ट्रीय प्रवासावर विक्रमी विदेशी चलन खर्च करीत आहेत. एकट्या जून २0१९ मध्ये भारतीयांच्या विदेशी प्रवासावर ५९६ दशलक्ष डॉलर खर्च झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 03:59 AM2019-08-17T03:59:29+5:302019-08-17T04:00:01+5:30

भारतीय लोक आंतरराष्ट्रीय प्रवासावर विक्रमी विदेशी चलन खर्च करीत आहेत. एकट्या जून २0१९ मध्ये भारतीयांच्या विदेशी प्रवासावर ५९६ दशलक्ष डॉलर खर्च झाले आहेत.

Indians spend lot of money on foreign travel | भारतीयांनी विदेशी प्रवासावर खर्च केले विक्रमी परकीय चलन

भारतीयांनी विदेशी प्रवासावर खर्च केले विक्रमी परकीय चलन

मुंबई : भारतीय लोक आंतरराष्ट्रीय प्रवासावर विक्रमी विदेशी चलन खर्च करीत आहेत. एकट्या जून २0१९ मध्ये भारतीयांच्या विदेशी प्रवासावर ५९६ दशलक्ष डॉलर खर्च झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने उदारीकृत धन प्रेषण योजनेंतर्गत (लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम) यासंबंधीचा डेटा ठेवायला सुरुवात केल्यापासून हा सर्वाधिक खर्च ठरला आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार, यंदाच्या जूनमध्ये भारतीयांनी खरेदी केलेल्या विदेशी चलनापैकी ४२ टक्के विदेशी चलन हे प्रवासावर खर्च झाले आहे. यामध्ये विदेश दौऱ्यांवर केलेला खर्च मोठा आहे. वित्त वर्ष २0१९ च्या पहिल्या तिमाहीत भारतीयांनी ४,१८१ दशलक्ष डॉलर खरेदी केले. त्यातील १,५९४ दशलक्ष डॉलर आंतरराष्ट्रीय प्रवासावर खर्च झाले आहेत. २0१८ मध्ये याच कालावधीतील एकूण विदेशी चलनातील भारतीयांचा खर्च ३ अब्ज डॉलर होता. त्यातील १ अब्ज डॉलर प्रवासावर खर्च झाले होते.
रिझर्व्ह बँकेकडून डॉलर खरेदीच्या नोंदी प्रवास, शिक्षण, मालमत्ता खरेदी, भेट अथवा बक्षिसी, गुंतवणूक आणि नजीकच्या नातेवाइकांची देखभाल अशा वेगवेगळ्या शीर्षाखाली ठेवल्या जातात. यातून डॉलर्सचा विनियोग कसा झाला, हे समजते. रिझर्व्ह बँकेने ठेवलेल्या या आकडेवारीनुसार डॉलर्सच्या खर्चात प्रवास पहिल्या स्थानी असून, दुसºया स्थानावर शिक्षण असल्याचे दिसून आले.
रिझर्व्ह बँकेने २00४ साली उदारीकृत धन प्रेषण योजना सुरू केली होती. वर्षाला २५ हजार डॉलर खर्च करण्याची परवानगी तेव्हा देण्यात आली होती. त्यात वारंवार सुधारणा करण्यात आल्या. आता ही मर्यादा वाढवून २,५0,000 डॉलर करण्यात आली आहे. हा पैसा भारतीय लोक जुगार आणि भारतीय रुपांतरणीय रोख्यांव्यतिरिक्त कुठल्याही कारणासाठी वापरू शकतात.

प्रवासावरच ३८१ दशलक्ष डॉलर्स

वर्षभरापूर्वी म्हणजेच जून २0१८ मध्ये विदेशी प्रवासावरील भारतीयांचा खर्च ३८१ दशलक्ष डॉलर होता, तर विदेशी चलनातील एकूण खर्च १ अब्ज डॉलर होता. एकूण खर्चाच्या तुलनेत प्रवासावरील खर्च ३७ टक्के होता. त्यापाठोपाठ २५ टक्के खर्च शिक्षणावर झाला. यंदा शिक्षणावरील खर्च आदल्या वर्षाएवढा स्थिर राहिला आहे. अमेरिका आणि ब्रिटन यांनी विदेशी व्यक्तींच्या व्हिसांवर अंशत: मर्यादा आणल्यामुळे यंदा विदेशातील शिक्षणावरील भारतीयांचा खर्च वाढला नाही. प्रवासावरील खर्च मात्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Web Title: Indians spend lot of money on foreign travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.