Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रवासाची तारीख बदलल्यावर रद्द करू नका आरक्षण, अडचणीशिवाय बदलता येईल तिकिटाची तारीख! 

प्रवासाची तारीख बदलल्यावर रद्द करू नका आरक्षण, अडचणीशिवाय बदलता येईल तिकिटाची तारीख! 

Indian Railways : रेल्वेद्वारे प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उपलब्ध आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 12:53 PM2022-05-16T12:53:49+5:302022-05-16T12:54:19+5:30

Indian Railways : रेल्वेद्वारे प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उपलब्ध आहे.

indian railways rules how to change travelling date on railway ticket how to reschedule railway ticket irctc | प्रवासाची तारीख बदलल्यावर रद्द करू नका आरक्षण, अडचणीशिवाय बदलता येईल तिकिटाची तारीख! 

प्रवासाची तारीख बदलल्यावर रद्द करू नका आरक्षण, अडचणीशिवाय बदलता येईल तिकिटाची तारीख! 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने काम करत आहे. यामुळेच दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. दरम्यान, प्रवासासाठी अनेक वेळा तुम्ही काही महिने आधीच तिकीट बुक (Reservation in Train) करता. पण बऱ्याचदा तुमचा प्लॅन शेवटच्या क्षणी बदलतो आणि तुम्हाला जिथे जायचे होते, तिथे दुसर्‍या दिवशी (Change in Traveling Date) जावे लागते. म्हणजेच तुमचा प्लॅन पुढे ढकलला (Postpone)जातो किंवा प्री-पोन  (Prepone) होतो.

तिकीट रद्द करण्याची गरज नाही
लास्ट टाइममध्ये तुम्ही रेल्वेचे काढलेले जुने तिकीट रद्द करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला नवीन तिकीट मिळत नसेल तर थोडा वेळ थांबा. कारण, प्रवासाच्या तारखेत बदल झाल्यास तुम्हाला तिकीट रद्द करण्याची गरज नाही आणि तुम्ही त्याच ट्रेनमध्ये प्रवास करू शकता. यासाठी तुमचे रेल्वेचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

काय आहे रेल्वेचा नियम?
रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख पुढे किंवा मागे करू शकता. तुमच्‍या प्रवासाची तारीख बदलण्‍यासाठी, तुम्‍हाला ट्रेन सुटण्‍याच्‍या किमान 24 तास अगोदर बोर्डिंग स्‍टेशनच्‍या स्‍टेशन मॅनेजर किंवा संगणकीकृत आरक्षण केंद्राला भेट देऊन अर्ज करावा लागेल. रेल्वेद्वारे प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उपलब्ध आहे.

डेस्टिनेशन स्टेशन बदलू शकता
तुम्ही प्रवासाच्या गंतव्य स्थानकातही म्हणजेच डेस्टिनेशन स्टेशनात बदल करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचे डेस्टिनेशन स्टेशन (Destination Station) बदलून तुमचा प्रवास पुढे चालू ठेवू शकता. यासाठी तुम्हाला ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या TTE कडून डेस्टिनेशन स्टेशन जाण्यासाठी तिकीट खरेदी करावे लागेल. तुमच्याकडे तिकीट असेल तिथून पुढे जाण्यासाठी, तुम्हाला तेथून डेस्टिनेशन स्टेशनपर्यंत तिकीट काढावे लागेल.

Web Title: indian railways rules how to change travelling date on railway ticket how to reschedule railway ticket irctc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.