lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Salary Hike: खूशखबर! 2022 मध्ये मिळणार बंपर पगारवाढ; सर्व्हेमध्ये कंपन्या तयार 

Salary Hike: खूशखबर! 2022 मध्ये मिळणार बंपर पगारवाढ; सर्व्हेमध्ये कंपन्या तयार 

How much salary hike can you expect next year? डेलॉयटच्या कर्मचारी आणि पगारवाढीच्या सर्व्हेमध्ये 2021 च्या सेकंड फेजनुसार 92 टक्के कंपन्यांनी यंदा आठ टक्के पगारवाढ दिली. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या जवळपास 25 टक्के कंपन्यांनी पुढील वर्षी दुहेरी अंकात पगारवाढ देण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 03:49 PM2021-09-20T15:49:59+5:302021-09-20T16:04:17+5:30

How much salary hike can you expect next year? डेलॉयटच्या कर्मचारी आणि पगारवाढीच्या सर्व्हेमध्ये 2021 च्या सेकंड फेजनुसार 92 टक्के कंपन्यांनी यंदा आठ टक्के पगारवाढ दिली. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या जवळपास 25 टक्के कंपन्यांनी पुढील वर्षी दुहेरी अंकात पगारवाढ देण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Indian Employees Can Get 8.6% Salary Hike in 2022; Deloitte survey says | Salary Hike: खूशखबर! 2022 मध्ये मिळणार बंपर पगारवाढ; सर्व्हेमध्ये कंपन्या तयार 

Salary Hike: खूशखबर! 2022 मध्ये मिळणार बंपर पगारवाढ; सर्व्हेमध्ये कंपन्या तयार 

भारतीय उद्योग जगतातून मोठी खूशखबर येत आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये सरासरी 8.6 टक्के पगारवाढ (Salary Hike) मिळण्याचा अंदाज आहे. डेलॉयटच्या एका सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे. भारतीय कार्पोरेटने 2021 मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी 8 टक्के पगारवाढ दिली आहे. यामुळे पुढील वर्षी ही वाढणारी पगारवाढ चांगल्या अर्थव्यवस्था आणि बाजारपेठेतील सुधारणा याचे संकेत मानले जात आहे. (you may get 8.6% salary hike in 2022.)

टाटांशी पंगा घेतलेला! सायरस मिस्त्रींची कंपनी कर्जात बुडाली; युरेका फोर्ब्स विकावी लागणार

डेलॉयटच्या कर्मचारी आणि पगारवाढीच्या सर्व्हेमध्ये 2021 च्या सेकंड फेजनुसार 92 टक्के कंपन्यांनी यंदा आठ टक्के पगारवाढ दिली. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या जवळपास 25 टक्के कंपन्यांनी पुढील वर्षी दुहेरी अंकात पगारवाढ देण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 2020 मध्ये केवळ 60 टक्के कंपन्यांनी पगारवाढ दिली होती. कोरोना महामारीच्या आधी म्हणजे 2019 मध्ये कंपन्यांनी 8.6 टक्के पगारवाढ दिली होती. 

Business from Home: नोकरीच कशाला करायला हवी? घरबसल्या हे 5 व्यवसाय सुरु करा, बक्कळ कमवा!

हा सर्व्हे जुलै 2021 पासून सुरु करण्यात आला. सुरुवातीला मोठमोठ्या कंपन्यांचे अनुभवी एचआरची मते नोंदविण्यात आली. यामध्ये 450 हून अधिक कंपन्यांचा सहभाग होता. कर्मचाऱ्याचे कौशल्य आणि प्रदर्शन यावरून या कंपन्या पगारवाढ देणार आहेत. सर्वात चांगले प्रदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्याला सरासरीपेक्षा 1.8 पटींनी जास्त पगारवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

डेलॉयट टच तोहमत्सु इंडिया एलएलपीचे पार्टनर आनंदोरूप घोष यांच्यानुसार अधिकांश कंपन्या 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये चांगली पगारवाढ देण्याच्या मूडमध्ये आहेत. कोरोनामुळे अनिश्चितता असतानाही या कंपन्या काम करत आहेत. कंपन्यांनाही यंदाचा व्यवसाय किती होईल याचा अंदाज नाहीय. तरीही काहींनी सकारात्मकता दाखविली आहे. अशा काही कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 2021 मध्ये देखील पगारवाढ दिलेली नाही. 
 

Web Title: Indian Employees Can Get 8.6% Salary Hike in 2022; Deloitte survey says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.