Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची चार दिवसांत सुमारे दीड लाख खाती

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची चार दिवसांत सुमारे दीड लाख खाती

मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील ६ डिव्हिजनमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 06:25 AM2020-03-07T06:25:28+5:302020-03-07T11:57:04+5:30

मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील ६ डिव्हिजनमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

India Post Payment Bank accounts around 1.5 lakh within four days | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची चार दिवसांत सुमारे दीड लाख खाती

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची चार दिवसांत सुमारे दीड लाख खाती

मुंबई : टपाल खात्याची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला (आयपीपीबी) मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मुंबई विभागात राबविण्यात आलेल्या महालॉगिन कार्यक्रमाअंतर्गत अवघ्या चार दिवसांत मुंबईत एक लाख ४२ हजार ५०० नवीन खाती सुरू करण्यात आली आहेत. मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील ६ डिव्हिजनमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय पोस्टमनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा विश्वास पांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
मुंबईतील ६ डिव्हिजनमध्ये १८०६ पोस्टमन व इतर टपाल कर्मचाऱ्यांनी नवीन खाती उघडण्यास सहकार्य केले. रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसरात याबाबत माहिती देणारी व खाती उघडणारी केंद्रे तयार करण्यात आली होती. केवळ आधार कार्ड क्रमांक सांगून अवघ्या १०० रुपयांपासून खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध असल्याने अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. कर्मचाऱ्यांनीदेखील सायंकाळी उशिरापर्यंत काम केले.
मुंबई विभागात आयपीपीबीची सुमारे अडीच लाख खाती आतापर्यंत उघडली आहेत. या खात्यांमध्ये बचत करण्याची कमाल मर्यादा १ लाख रुपये आहे. जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा व त्यांची खाती उघडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पांडे यांनी सांगितले.
>डिजिटल व्यवहार करणे शक्य
आयपीपीबीच्या माध्यमातून ग्राहकांना डिजिटल आर्थिक व्यवहार सहजपणे करणे शक्य होतात व सर्व प्रकारची पेमेंट करता येतात. त्याशिवाय ज्या ग्राहकाचे दुसºया बँकेत खाते असेल व ते आधार कार्डशी संलग्न केलेले असल्यास दोन्ही खात्यांमध्ये आॅनलाइन आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे.

Web Title: India Post Payment Bank accounts around 1.5 lakh within four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.