Lokmat Money > बिझनेस न्यूज > TATA लय भारी! यंदाच्या वर्षात ४० हजार फ्रेशर्सला TCS देणार नोकरी

TATA लय भारी! यंदाच्या वर्षात ४० हजार फ्रेशर्सला TCS देणार नोकरी

TCS hiring plan: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) यंदाच्या आर्थिक वर्षात ४० हजाराहून अधिक फ्रेशर्सना  महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या माध्यमातून नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 09:09 PM2021-07-09T21:09:42+5:302021-07-09T21:10:47+5:30

TCS hiring plan: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) यंदाच्या आर्थिक वर्षात ४० हजाराहून अधिक फ्रेशर्सना  महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या माध्यमातून नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

India biggest private employer TCS will hire 40000 freshers this year | TATA लय भारी! यंदाच्या वर्षात ४० हजार फ्रेशर्सला TCS देणार नोकरी

TATA लय भारी! यंदाच्या वर्षात ४० हजार फ्रेशर्सला TCS देणार नोकरी

TCS hiring plan: देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) यंदाच्या आर्थिक वर्षात ४० हजाराहून अधिक फ्रेशर्सना  महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या माध्यमातून नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रूपच्या मालकीची टीसीएस कंपनी खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या सध्या ५ लाखांहून अधिक आहे. गेल्यावर्षी देखील कंपनीनं ४० हजार फ्रेशर्सना संधी दिली होती. कंपनीच्या ग्लोबल ह्यूमन रिसोर्स चीफ मिलिंद लक्कड यांनी यंदा कंपनीकडून जास्तीत जास्त नोकरभरती केली जाईल असं सांगितलं आहे. (India biggest private employer TCS will hire 40000 freshers this year)

"कोरोनाचं संकट असतानाही नवे कर्मचारी दाखल करुन घेण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही. गेल्या वर्षी कर्मचारी भरती प्रक्रियेत एकूण ३ लाख ६० हजार फ्रेशर्सनं नशीब आजमावलं होतं. यात गेल्यावर्षी देखील कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ४० हजाराहून अधिक जणांना नोकरीची संधी देण्यात आली होती. यंदाही याच प्रमाणात संधी दिली जाईल", असं मिलिंद लक्कड म्हणाले. 

कंपनीला एखादं प्रोजेक्ट मिळाल्यानंतरच भरतीची प्रक्रिया सुरू होईल असं काही नाही. नोकरी देण्याची एकंदर प्रक्रियाच खूप वेळकाढू असते. एखाद्याला नोकरी देण्यास त्याला किमान तीन महिने लागतात. त्यानंतरच तो प्रोजेक्टमध्ये काम करण्यास सुरुवात करतो, असंही लक्कड यांनी सांगितलं.

टीसीएसला मोठा नफा
विशेष म्हणजे टीसीएसला चालू आर्थिक वर्षात २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त नफा कमावला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा नफा २८.५ टक्क्यांनी वाढून ९,००८ कोटी रुपये झाला. याआधी २०२०-२१ या वर्षात आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला ७,००८ कोटी रुपयांचा नफा झाला होता. 

Web Title: India biggest private employer TCS will hire 40000 freshers this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.