Lokmat Money > बिझनेस न्यूज > मराठवाड्यात पॅकबंद तेलाचा वाढता वापर; स्थानिक ब्रॅण्डही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात

मराठवाड्यात पॅकबंद तेलाचा वाढता वापर; स्थानिक ब्रॅण्डही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात

घरी बनविलेले अन्नपदार्थ हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:46 PM2019-09-23T12:46:18+5:302019-09-23T12:46:59+5:30

घरी बनविलेले अन्नपदार्थ हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे.

Increased use of packaged oil in Marathwada; Local brands also exist in large quantities | मराठवाड्यात पॅकबंद तेलाचा वाढता वापर; स्थानिक ब्रॅण्डही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात

मराठवाड्यात पॅकबंद तेलाचा वाढता वापर; स्थानिक ब्रॅण्डही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात

मुंबई : घरी बनविलेले अन्नपदार्थ हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. कोणताही पदार्थ बनविण्यात स्वयंपाकाचे तेल हे महत्त्वाची भूमिका बजावत असते. लोकमतच्या इनसाईट टीमने मराठवाड्यातील नागरिकांच्या स्वयंपाकाचे तेल वापरण्याच्या सवयीचा अभ्यास केला.या भागात दरमहा सरासरी ५.३३ लिटर तेलाचा वापर केला जातो. अनेक तेलाच्या गिरण्यांमध्ये सुटे तेल विकले जाते.

‘लोकमत’च्या इनसाईट टीमने मराठवाड्यामध्ये सर्वेक्षण करून स्वयंपाकाचे तेल, त्याच्या खरेदीची पद्धत याबाबतची माहिती संकलित केली. त्यामधून दोन तृतीयांश ग्राहक हे पिशवीबंद तेल विकत घेत असल्याचे समोर आले आहे. असे असले तरी अद्याप ३४ टक्के ग्राहक हे सुट्या तेलाची खरेदी करीत असतात. स्वयंपाकाच्या तेलामध्ये वेगवेगळ्या भागात आणि वेगवेगळ्या गटांमध्ये वेगवेगळे प्रकार लोकप्रिय असतात व ते त्याप्रमाणेच तेलाचा वापर करताना आढळून येतात. ग्राहकांकडून तेलाच्या ब्रॅण्डपेक्षा प्रकाराला जास्त महत्त्व दिलेले आढळून येते.


>कीर्ती गोल्ड आणि जेमिनी या प्रख्यात ब्रॅण्डबरोबरच अन्य काही स्थानिक ब्रॅण्डसुद्धा नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. या सर्वेक्षणात मराठवाडा भागात राष्ट्रीय ब्रॅण्डस्ना आपला प्रसार करण्याची संधी असल्याचे दिसून आले आहे.
>स्त्रोत : या सर्व मजकुराचा स्त्रोत हा लोकमतच्या इनसाइटस् टीमने सर्वेक्षण करून काढलेले निष्कर्ष तसेच वेगवेगळे अहवाल व कंपन्यांच्या संकेतस्थळांवरील माहिती हा आहे.

Web Title: Increased use of packaged oil in Marathwada; Local brands also exist in large quantities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.