Lokmat Money > बिझनेस न्यूज > IMF Report : यावर्षी बांगलादेशातील नागरिकांपेक्षाही कमी होणार भारतीयांची कमाई!

IMF Report : यावर्षी बांगलादेशातील नागरिकांपेक्षाही कमी होणार भारतीयांची कमाई!

आयएमएफच्या अहवालानुसार, बांगलादेशचा दरडोई जीडीपी 2020मध्ये 4 टक्क्यांनी वाढून 1888 डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. यापूर्वी जून महिन्यात आयएमएफने यात 4.5 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज वर्तवला होता. (IMF)

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 01:02 PM2020-10-14T13:02:05+5:302020-10-14T13:06:26+5:30

आयएमएफच्या अहवालानुसार, बांगलादेशचा दरडोई जीडीपी 2020मध्ये 4 टक्क्यांनी वाढून 1888 डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. यापूर्वी जून महिन्यात आयएमएफने यात 4.5 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज वर्तवला होता. (IMF)

imf warns India set to drop below bangladesh in per capita growth  | IMF Report : यावर्षी बांगलादेशातील नागरिकांपेक्षाही कमी होणार भारतीयांची कमाई!

IMF Report : यावर्षी बांगलादेशातील नागरिकांपेक्षाही कमी होणार भारतीयांची कमाई!

Highlightsआंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्तवलेल्या अंदाजानुसार या आर्थिक वर्षात भारताच्या दर डोई जीडीपीत 10.3 टक्क्यांची घट होईल.आयएमएफचा हा अंदाज सत्य सिद्ध झाल्यास दर डोई जिडिपीत भारत बांगलादेशपेक्षाही खाली जाईल.पुढील आर्थिक वर्षात आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा आर्थिक विकासदर 8.8 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्तवलेल्या अंदाजानुसार या आर्थिक वर्षात भारताच्या दर डोई जीडीपीत 10.3 टक्क्यांची घट होईल. आयएमएफचा हा अंदाज सत्य सिद्ध झाल्यास दर डोई जिडिपीत भारतबांगलादेशपेक्षाही खाली जाईल. आयएमएफचा मंगळवारी जारी झालेला अहवाल World Economic Outlook नुसार, 31 मार्च 2021रोजी संपणाऱ्या या आर्थिक वर्षात भारताच्या दर डेई जीडीपीत 10.3 टक्क्यांची घट होऊन तो 1877 डॉलरवर येईल. 

आयएमएफच्या अहवालानुसार, बांगलादेशचा दरडोई जीडीपी 2020मध्ये 4 टक्क्यांनी वाढून 1888 डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. यापूर्वी जून महिन्यात आयएमएफने यात 4.5 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज वर्तवला होता. 

हे 5 पर्याय देतात बँक फिक्स डिपॉझिटपेक्षाही अधिक रिटर्न, यांत गुंतवणूक केली तर व्हाल मालामाल!

असे असले, तरी पुढील आर्थिक वर्षात आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा आर्थिक विकासदर 8.8 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास भारत पुन्हा एकदा सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल. यादरम्यान चीनचा विकासदर 8.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत 4.4 टक्क्यांची घसरण -
आयएमएफच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात जागतिक आर्थव्यवस्थेत 4.4 टक्क्यांची घट होऊ शकते. वर्ष 2021मध्ये यात 5.2 टक्क्यांचीही मोठी वृद्धी होऊ शकते. आयएमएफच्या अहवालात म्हणण्यात आले आहे, की 2020दरम्यान जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये केवळ चीनच्या जीडीपीमध्येच 1.9 टक्क्यांची वाढ नोंदवली जाईल.

Web Title: imf warns India set to drop below bangladesh in per capita growth 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.