Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री! ICICI बँकेची ‘ही’ सेवा महागणार; १ जानेवारीपासून शुल्क वाढणार

ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री! ICICI बँकेची ‘ही’ सेवा महागणार; १ जानेवारीपासून शुल्क वाढणार

ICICI बँकेने यासंदर्भातील माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 05:30 PM2021-11-30T17:30:12+5:302021-11-30T17:30:43+5:30

ICICI बँकेने यासंदर्भातील माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे.

icici bank revised to increase service charges over domestic savings accounts from 1st january 2022 | ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री! ICICI बँकेची ‘ही’ सेवा महागणार; १ जानेवारीपासून शुल्क वाढणार

ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री! ICICI बँकेची ‘ही’ सेवा महागणार; १ जानेवारीपासून शुल्क वाढणार

नवी दिल्ली: खासगी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ICICI बँकेने ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री लागणारा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय बँकेने यासंदर्भातील माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे. १ जानेवारी २०२२ पासून आयसीआयसीआय बँक याची अंमलबजावणी करणार आहे. ICICI बँक ATM आणि कॅश रिसायक्लिर मशीनमधून रोख काढण्याशी संबंधित शुल्क वाढवणार असल्याचे सांगितले जात आहे. 

बिगर ICICI बँक एटीएममधील व्यवहारांसंदर्भात बोलायचे झाले, तर ६ मेट्रो स्थानांवर ३ व्यवहार विनामूल्य आहेत. तुम्ही ३ व्यवहार मेट्रो शहरांत करता आणि २ व्यवहार इतर कोणत्याही ठिकाणी केले, तर ते विनामूल्य असेल. मात्र, एका महिन्यात या विनामूल्य व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर जर ग्राहक गैर-आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवरून त्याच महिन्यात व्यवहार करीत असेल, तर २० रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारासाठी ८.५० रुपये सेवा शुल्क असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ पासून हे शुल्क आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात २१ रुपयांपर्यंत वाढणार आहे.

एका महिन्यातील पहिले ५ आर्थिक व्यवहार विनामूल्य

आताच्या घडीला ICICI बँकेच्या ATM किंवा कॅश रिसायक्लिर मशिनमधून कॅश ट्रान्झॅक्शन केल्यानंतर महिन्यातील पहिले ५ आर्थिक व्यवहार विनामूल्य होत आहेत. त्यानंतर प्रति वित्तीय व्यवहार २० रुपये शुल्क आकारले जाते, पण १ जानेवारीपासून २०२२ पासून हे शुल्क प्रति वित्तीय व्यवहार २१ रुपये होणार आहे. ICICI बँक एटीएममधून केलेले सर्व गैर-आर्थिक व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ते विनामूल्य आहे. रोख पैसे काढणे आर्थिक व्यवहारांमध्ये येते, तर गैर-आर्थिक व्यवहारांमध्ये बॅलन्स तपासणे, मिनी स्टेटमेंट पाहणे आणि पिन बदलणे यांचा समावेश आहे.
 

Web Title: icici bank revised to increase service charges over domestic savings accounts from 1st january 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.