Lokmat Money > बिझनेस न्यूज > Google Pay, Paytm आणि फोन पे च्या मदतीनं एटीएममधून काढा कॅश; पाहा संपूर्ण प्रक्रिया

Google Pay, Paytm आणि फोन पे च्या मदतीनं एटीएममधून काढा कॅश; पाहा संपूर्ण प्रक्रिया

तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल तरी तुम्ही एटीएम मशीनच्या माध्यमातून पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला UPI बेस्ड अॅपची मदत घ्यावी लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 04:14 PM2022-05-16T16:14:19+5:302022-05-16T16:14:42+5:30

तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल तरी तुम्ही एटीएम मशीनच्या माध्यमातून पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला UPI बेस्ड अॅपची मदत घ्यावी लागेल.

How to withdraw money from an ATM machine using Google Pay, Paytm and other UPI-based payment apps know procedure | Google Pay, Paytm आणि फोन पे च्या मदतीनं एटीएममधून काढा कॅश; पाहा संपूर्ण प्रक्रिया

Google Pay, Paytm आणि फोन पे च्या मदतीनं एटीएममधून काढा कॅश; पाहा संपूर्ण प्रक्रिया

तुम्ही एटीएममधून डेबिट कार्डाच्या मदतीनं पैसे काढले असतीलच. परंतु तुम्हाला माहितीये तुम्ही एटीएममधून स्मार्टफोनमधील युपीआय अॅप्सच्या मदतीनंही पैसे काढू शकता. यासाठी एनसीआर कॉर्पोरेशननं काही महिन्यांपूर्वी एटीएम अपग्रेड करणार असल्याची माहितीही दिली आहे. 

या माध्यमातून युपीआय प्लॅटफॉर्मद्वारे इंटरपोर्टेबल कार्डलेस कॅश विथड्राव्हल करता येऊ शकतं. याचाच अर्थ तुम्ही एटीएम मशीनमधून विना डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड पैसे काढू शकता. जर तुमच्याकडे कार्ड नसेल तर अशा परिस्थितीत याचा वापर करता येऊ शकतो. पाहुया कसे तुम्ही पैसे काढू शकाल. या सेवेचा वापर करण्यासाठी एटीएम मशीन युपीआय सर्व्हिस अनेबल्ड असणं आवश्यक आहे. याच्याशिवाय तुम्हाला पैसे काढता येऊ शकणार नाही. 

याशिवाय तुमच्या मोबाइलवर युपीआय बेस्ड Gpay, PhonePe, Amazon Pay, Paytm यापैकी कोणतंही एक अॅप असणं अनिवार्य आहे. तसंच या फीचरचा वापर करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये अॅक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन असणंही आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला एटीएममध्ये जाऊन विथड्राव्हल कॅश हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर एटीएम मशीनच्या स्क्रिनवर युपीआयचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल.

यानंतर तुम्हाला एटीएनच्या स्क्रिनवर एक क्युआर कोड दिसेल. क्युआर कोड दिसल्यानंतर युपीआय बेस्ड अॅपमध्ये जाऊन क्युआर कोड स्कॅन करा. तसंच जितकी अमाऊंट तुम्हाला काढायची असेल ती टाका. सध्या याचं लिमिट ५ हजार रुपये ठेवण्यात आलं आहे. तुमचा क्युआर कोड स्कॅन झाल्यानंतर प्रोसिडवर क्लिक करा आणि युपीआय पिन टाका. तुम्हाला एटीएममधून तुम्ही टाकलेली रक्कम मिळेल.

Web Title: How to withdraw money from an ATM machine using Google Pay, Paytm and other UPI-based payment apps know procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.