Lokmat Money > बिझनेस न्यूज > HDFC चा मेगा प्लान! देशातील २ लाख गावांमध्ये करणार सेवाविस्तार; २५०० नोकऱ्या देणार

HDFC चा मेगा प्लान! देशातील २ लाख गावांमध्ये करणार सेवाविस्तार; २५०० नोकऱ्या देणार

HDFC बँकेने देशभरात शाखांचे जाळे विस्तारण्यासाठी एक मेगा प्लान तयार केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 09:52 AM2021-09-27T09:52:50+5:302021-09-27T09:54:38+5:30

HDFC बँकेने देशभरात शाखांचे जाळे विस्तारण्यासाठी एक मेगा प्लान तयार केला आहे. 

hdfc bank to double rural reach to 2 lakh villages in two years and to provide 2500 jobs | HDFC चा मेगा प्लान! देशातील २ लाख गावांमध्ये करणार सेवाविस्तार; २५०० नोकऱ्या देणार

HDFC चा मेगा प्लान! देशातील २ लाख गावांमध्ये करणार सेवाविस्तार; २५०० नोकऱ्या देणार

Highlightsप्रत्येक पिनकोड पत्त्याच्या परिसरात सेवा पोहोचवण्याचे लक्ष्यदेशातील एक तृतीयांश ग्रामीण भागांमध्ये बँकेचे अस्तित्त्वHDFC ने घेतला कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय

नवी दिल्ली: देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणजे एचडीएफसी. HDFC बँकेने देशभरात शाखांचे जाळे विस्तारण्यासाठी एक मेगा प्लान तयार केला आहे. यानुसार ग्रामीण भागातील दोन लाख गावांपर्यंत बँक पोहोचणार असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यानुसार, सुमारे २ हजार ५०० नोकऱ्या एचडीएफसी बँक देणार असल्याचे सांगितले जात आहे. (hdfc bank to double rural reach to 2 lakh villages in two years and to provide 2500 jobs)

LIC चा IPO लिस्टिंग आणि AIR INDIA चे खासगीकरण कधी होणार? वित्त सचिवांनी केले स्पष्ट

एचडीएफसी बँकेने ग्रामीण भागात विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यादृष्टीने येत्या दोन वर्षांत देशातील दोन लाख गावांमध्ये बँकेच्या शाखांचे जाळे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीची संधी मिळू शकेल. बँकेच्या माहितीनुसार, आगामी ६ महिन्यांत सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून, यामुळे बँकेच्या सेवा पोहोचवणे शक्य होईल.

TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले!

प्रत्येक पिनकोड पत्त्याच्या परिसरात सेवा पोहोचवण्याचे लक्ष्य

एचडीएफसी बँकेने देशातील प्रत्येक पिनकोड पत्त्याच्या परिसरात सेवा पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. येत्या दोन वर्षांत एचडीएफसी बँक देशाच्या अनेक भागांमध्ये आपले शाखा नेटवर्क, व्यवसाय संवाददाता, व्यवसाय सुविधा, सामान्य सेवा केंद्र भागीदार, आभासी संबंध व्यवस्थापन आणि डिजिटल सेवा यांमध्ये वाढ करणार आहे. अलीकडेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील ग्रामीण भागात बँकांच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एचडीएफसी बँकेने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. 

Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

देशातील एक तृतीयांश ग्रामीण भागांमध्ये बँकेचे अस्तित्त्व

एचडीएफसी बँक आताच्या घडीला देशातील ५५० जिल्ह्यांमध्ये सेवा पुरवते. एचडीएफसी बँक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात जास्तीत जास्त बँकिंग सेवा पुरवते. देशाच्या अन्य भागात त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी या बँकेने २ हजार ५०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारानंतर देशातील एक तृतीयांश ग्रामीण भागांमध्ये बँकेचे अस्तित्त्व निर्माण होईल, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. या योजनेनंतर देशातील बहुतांश भागाला बँकिंग क्षेत्राशी जोडणे सोपे होईल आणि जास्तीत जास्त देशवासी बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतील. क्रेडिट आणि कर्जाच्या बाबतीत, देशातील ग्रामीण आणि निम-शहरी भाग अजूनही मोठ्या प्रमाणावर सेवांपासून दूर आहेत. तथापि, बँकिंग व्यवस्थेच्या शाश्वत विकासात ही क्षेत्रे मोठी भूमिका बजावू शकतात, असा विश्वास एचडीएफसी बँकेचे कमर्शियल अँड रूरल बँकिंग ग्रुप हेड राहुल शुक्ला यांनी व्यक्त केला आहे. 
 

Web Title: hdfc bank to double rural reach to 2 lakh villages in two years and to provide 2500 jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.