Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटी पोर्टल सतत होत आहे हॅँग, रिटर्न फाईल करण्याची ३१ ऑगस्टची मुदत वाढविण्याची मागणी

जीएसटी पोर्टल सतत होत आहे हॅँग, रिटर्न फाईल करण्याची ३१ ऑगस्टची मुदत वाढविण्याची मागणी

जीएसटीच्या नियमित भरणासोबतच वार्षिक रिटर्न फाइल करण्याची तारीख ३१ ऑगस्ट आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 05:20 AM2019-08-22T05:20:58+5:302019-08-22T05:25:02+5:30

जीएसटीच्या नियमित भरणासोबतच वार्षिक रिटर्न फाइल करण्याची तारीख ३१ ऑगस्ट आहे.

The GST Portal is constantly hanging, demanding an extension of August 5th to file returns | जीएसटी पोर्टल सतत होत आहे हॅँग, रिटर्न फाईल करण्याची ३१ ऑगस्टची मुदत वाढविण्याची मागणी

जीएसटी पोर्टल सतत होत आहे हॅँग, रिटर्न फाईल करण्याची ३१ ऑगस्टची मुदत वाढविण्याची मागणी

- संजय खांडेकर

अकोला : जीएसटीचे वार्षिक रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट असताना जीएसटीचे पोर्टल वारंवार हँग होत आहे. आधीच वेळ अपुरा आणि त्यात तांत्रिक समस्या निर्माण होत असल्याने व्यापारी त्रासले असून रिटर्न फाईल करायला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. जवळपास ५० टक्के एजन्सी आणि व्यापाऱ्यांनी अद्याप जीएसटी रिटर्न फाइल केलेले नाही.
जीएसटीच्या नियमित भरणासोबतच वार्षिक रिटर्न फाइल करण्याची तारीख ३१ ऑगस्ट आहे. तिमाही जीएसटीआर ९ आणि इतर नोंदी करीत असताना, तांत्रिक बिघाड उद्भवतो; मात्र विलंब शुल्काचा भुर्दंड मात्र व्यापाऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे पोर्टल क्षमतेवर याआधी अनेकदा उखळ-पाखड झालेली आहे. तीच समस्या आता जीएसटी रिटर्न फाइल करीत असताना येत आहे. याबाबतअनेक कर सल्लागार आणि व्यापाºयांनी जीएसटीच्या व्हॉट्स अ‍ॅपवर तक्रारी नोंदविल्या आहेत.

Web Title: The GST Portal is constantly hanging, demanding an extension of August 5th to file returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी