Lokmat Money > बिझनेस न्यूज > Google Payment Rule Change: ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांनी इकडे लक्ष द्यावे; 1 जानेवारीपासून गुगलचा नियम बदलणार

Google Payment Rule Change: ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांनी इकडे लक्ष द्यावे; 1 जानेवारीपासून गुगलचा नियम बदलणार

Google Payment Rule Change: आरबीआयने गुगलला बँकिंग संबंधी सेवा सुर करण्याची परवानगी दिलेली नसल्याचे म्हटले होते. तरीही करोडो लोक गुगल पे द्वारे ट्रान्झेक्शन करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 08:09 PM2021-11-30T20:09:41+5:302021-11-30T20:10:41+5:30

Google Payment Rule Change: आरबीआयने गुगलला बँकिंग संबंधी सेवा सुर करण्याची परवानगी दिलेली नसल्याचे म्हटले होते. तरीही करोडो लोक गुगल पे द्वारे ट्रान्झेक्शन करतात.

Google's rules will change from January 1, 2022 on Online Payment by ATM, Credit Card | Google Payment Rule Change: ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांनी इकडे लक्ष द्यावे; 1 जानेवारीपासून गुगलचा नियम बदलणार

Google Payment Rule Change: ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांनी इकडे लक्ष द्यावे; 1 जानेवारीपासून गुगलचा नियम बदलणार

गुगल (Google) कडून रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात आहे. याचा थेट परिणाम ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या लोकांवर होणार आहे. नवीन नियम गुगलच्या सर्वा सर्व्हिस जसे की गुगल अॅड (Google Ads), यू-ट्यूब (YouTube), गुगल प्ले स्टोर आणि पैशांच्या देवान-घेवाण करत असलेल्या सर्व्हिसवर लागू होणार आहे. यामुळे सर्वांनी गुगलच्या या नव्या नियमाबाबत जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे. 

आरबीआयने गुगलला बँकिंग संबंधी सेवा सुर करण्याची परवानगी दिलेली नसल्याचे म्हटले होते. तरीही करोडो लोक गुगल पे द्वारे ट्रान्झेक्शन करतात. तसेच त्यांच्या सेवांवरून पैसे अदा करतात. यामुळे येत्या 1 जानेवारी 2022 पासून गुगल तुमच्या एचटीएम, क्रेडिट कार्डची माहिती स्टोअर करून ठेवणार नाही. यामुळे तुम्हाला तुमच्या कार्डचा नंबर तिथे दिसणार नाही. तसेच एक्स्पायरी डेटही दिसणार नाही. या आधी ग्राहक कार्डाचा सीव्हीव्ही नंबर आणि नंतर आलेला ओटीपी टाकून पेमेंट करत होता. आता ग्राहकाला सारखे सारखे कार्डाचा नंबर, एक्स्पायरी डेट भरावी लागणार आहे. 

आरबीआयने संवेदनशील माहिती सुरक्षित बनविण्यासाठी कार्ड डिटेल सेव्ह न करण्याचा आदेश दिला आहे. जर तुम्ही व्हिसा किंवा मास्टरकार्ड कंपन्यांचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला नवीन फॉर्मॅटमध्ये कार्ड डिटेल सेव्ह करण्यासाठी ऑथराईज करावे लागणार आहे. 

जर तुम्ही RuPay, American Express, Discover किंवा Diners Card चा वापर करत असाल तर गुगल तुमच्या या कार्डाची माहिती 31 डिसेंबरपर्यंतच आपल्याकडे ठेवू शकणार आहे. या कार्डना नवीन फ़ॉर्मॅट लागू होत नाही. यामुळे तुम्हाला 1 जानेवारपासून मॅन्युअली नंबर टाकून नेहमी ट्रान्झेक्शन करावे लागणार आहे. 

Web Title: Google's rules will change from January 1, 2022 on Online Payment by ATM, Credit Card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.