Lokmat Money > बिझनेस न्यूज > PF : नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीआधी PF खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, अशाप्रकारे चेक करा तुमचा बॅलन्स

PF : नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीआधी PF खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, अशाप्रकारे चेक करा तुमचा बॅलन्स

EPFO : ईपीएफओच्या सेंट्रल बोर्डाने 8.5% टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने 8.5% व्याजावर अर्थ मंत्रालयाची मंजुरी मागितली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 03:01 PM2021-09-21T15:01:46+5:302021-09-21T15:05:34+5:30

EPFO : ईपीएफओच्या सेंट्रल बोर्डाने 8.5% टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने 8.5% व्याजावर अर्थ मंत्रालयाची मंजुरी मागितली आहे

good news for 6 crore epfo subscribers pf money will credited in account before diwali | PF : नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीआधी PF खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, अशाप्रकारे चेक करा तुमचा बॅलन्स

PF : नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीआधी PF खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, अशाप्रकारे चेक करा तुमचा बॅलन्स

नवी दिल्ली : कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओ सदस्यांना लवकरच पीएफवर (PF) व्याज मिळणार आहे. ईपीएफओ दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफवरील व्याजाचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. (good news for 6 crore epfo subscribers pf money will credited in account before diwali)

दरम्यान, ईपीएफओचे 6.5 कोटी सब्सक्रायबर्स पीएफवरील व्याजाच्या रकमेच्या (Interest on PF amount) प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत ही रक्कम दिवाळीआधी गिफ्ट म्हणून सदस्यांना मिळू शकते.

मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारकडून जेव्हा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना त्यांच्या खात्यात महागाई भत्ता मिळेल, त्याचवेळी ईपीएफओ व्याजाची रक्कमही त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल.

सरकार देणार मंजुरी
ईपीएफओच्या सेंट्रल बोर्डाने 8.5% टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने 8.5% व्याजावर अर्थ मंत्रालयाची मंजुरी मागितली आहे. त्यामुळे आता अशी आशा व्यक्त केली जात आहे की, सरकारकडून लवकरच यावर शिक्कामोर्तब केले जाईल. आर्थिक वर्ष 2020-2021 साठी ईपीएफओला अर्थ मंत्रालयाकडून 8.5% व्याजासाठी मंजुरी मिळल्यानंतर लगेच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाताील. त्यामुळे दिवाळी आधी हे पैसे खात्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


पीएफमधील बॅलन्स कसा तपासायचा? (How to check my PF Balance?)

1. SMS द्वारे जाणून घ्या पीएफ बॅलन्स
SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे.

2. Missed Call द्वारे जाणून घ्या पीएफ बॅलन्स
यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील बॅलन्स जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता.


3. Umang App च्या माध्यमातून
याकरता तुमचे उमंग App (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विस (employee-centric services) वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड (OTP) प्रविष्ट करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता. याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अॅपमधून घेऊ शकता.

4. वेबसाइटच्या माध्यमातून तपासा पीएफमधील बॅलन्स
 तुम्हाला पीएफ बॅलन्स पाहण्यासाठी Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. त्यावेळी तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.

Read in English

Web Title: good news for 6 crore epfo subscribers pf money will credited in account before diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.