Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price Today: सोनं पुन्हा एकदा झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: सोनं पुन्हा एकदा झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 418 रुपयांनी वाढली होती. तसेच चांदीचे दर प्रति किलो 2,246 रुपयांनी वाढले होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 02:56 PM2020-09-02T14:56:27+5:302020-09-02T14:56:47+5:30

दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 418 रुपयांनी वाढली होती. तसेच चांदीचे दर प्रति किलो 2,246 रुपयांनी वाढले होते. 

Gold Price Today: story gold price falls rs 551 today and silver price falls rs 2046 wednesday | Gold Price Today: सोनं पुन्हा एकदा झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: सोनं पुन्हा एकदा झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्लीः आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. बुधवारी देशभरातील सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 551 रुपयांनी घसरून 51,024 रुपयांवर आला आहे. सोमवारी सोन्याचा भाव 329 रुपयांनी वाढून 51,575 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर चांदीचा दर 2046 रुपयांनी घसरून 66356 रुपयांवर आला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळा(ibjarates.com)नुसार 2 सप्टेंबर 2020ला देशभरातील सोन्या-चांदीच्या किमतीत चढउतार पाहायला मिळाले आहेत. तत्पूर्वी अमेरिकी डॉलर इंडेक्समध्ये घसरण आणि दहा वर्षांच्या अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे विदेशी बाजारपेठेतील सोन्याच्या किमती वाढल्या होत्या. याचा परिणाम आज देशांतर्गत बाजारावरही झाला. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 418 रुपयांनी वाढली होती. तसेच चांदीचे दर प्रति किलो 2,246 रुपयांनी वाढले होते. 

स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! -
गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार फिजिकल सोन्याची मागणी कमी करण्यासाठी एक खास योजना चालवत आहे. या योजनेला 'सुवर्ण बॉन्ड योजना', असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा सोनं विकत आहे. सरकार बॉन्डच्या स्वरुपात सोन्याची विक्री करत असते. या सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेकडून निश्चित केली जाते. रिझर्व्ह बँक वेळोवेळी या सोन्याची किंमत जारी करत असते. ही किंमत बाजारातील फिजिकल सोन्याच्या तुलनेत कमी आणि सुरक्षित असते. 

यावेळी सुवर्ण बॉन्डची किंमत 5,117 रुपये प्रति ग्रॅम -
रिझर्व्ह बँकेने यावेळी सुवर्ण बॉन्डची किंमत 5,117 रुपये प्रति ग्रॅम एवढी ठेवली आहे. सुवर्ण बॉन्डच्या खरेदीसाठी डिजिटल पद्धतीने पैसे जमा केल्यास प्रति ग्रॅम 50 रुपयांची सुटही मिळणार आहे. अशा गुंतवणूकदारांच्या बॉन्डची किंमत 5,067 रुपये प्रति ग्रॅम एवढी असेल. ही योजना 31 ऑगस्टला सुरू होऊन 4 सप्टेंबरला बंद होईल. याचाच अर्थ आपण या काळात सोन्याची खरेदी करू शकता. या योजनेत कमीतकमी एक ग्रॅम सोने विकत घेता येऊ शकते. हे सोने विकत घेण्यासाठी आपल्याला आपल्या बँक, बीएसई, एनएसईची वेबसाईट अथवा पोस्ट ऑफीसशी संपर्क साधावा लागेल. येथून सुवर्ण बॉन्ड डिजिटलपद्धतीने विकत घेतले जाऊ शकतात. ही एक प्रकारची अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहे. कारण यात सोन्याच्या शुद्धतेची आणि सुरक्षिततेचीही चिंता नसते.
 

Web Title: Gold Price Today: story gold price falls rs 551 today and silver price falls rs 2046 wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.