Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुवर्ण झळाळी! सोन्याच्या दरानं मोडले सगळे विक्रम; सलग सोळाव्या दिवशीत किमतीत वाढ

सुवर्ण झळाळी! सोन्याच्या दरानं मोडले सगळे विक्रम; सलग सोळाव्या दिवशीत किमतीत वाढ

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ; जागतिक अर्थकारणामुळे सोने, चांदी तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 06:30 PM2020-08-07T18:30:24+5:302020-08-07T18:33:00+5:30

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ; जागतिक अर्थकारणामुळे सोने, चांदी तेजीत

gold price surged for the 16th straight session on friday and touched an all time high of rs 57008 per 10 grams | सुवर्ण झळाळी! सोन्याच्या दरानं मोडले सगळे विक्रम; सलग सोळाव्या दिवशीत किमतीत वाढ

सुवर्ण झळाळी! सोन्याच्या दरानं मोडले सगळे विक्रम; सलग सोळाव्या दिवशीत किमतीत वाढ

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती, शेअर बाजारातील पडझड यामुळे अनेक जण पारंपरिक गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ सुरू आहे. त्यामुळेच प्रथमच सोन्याच्या दरानं ५७ हजारांचा (प्रति १० तोळे) टप्पा ओलांडला आहे. सोन्यासोबतच चांदीनंदेखील सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. सध्या १ किलो चांदीसाठी ७७ हजार रुपये मोजावे लागत आहेत. 

अमेरिकन डॉलरच्या किमतीमध्ये घसरण सुरू असल्यानं सोन्याच्या किमती वाढत असल्याचं अर्थ क्षेत्रातल्या जाणकारांनी सांगितलं. जगातल्या प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची घसरण झाली आहे. डॉलर गेल्या दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर आला आहे. याशिवाय अमेरिका आणि चीनमधील तणावदेखील वाढला आहे. त्यामुळे अनेकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

आज दिल्लीतल्या सराफा बाजारात प्रति १० ग्राम सोन्याचा दर ५७,००८ रुपयांवर पोहोचला आहे. त्याआधी गुरुवारी सोन्याचा दर ५७,००२ रुपयांवर गेला होता. आज सोन्याचा दर आणखी वाढला. मुंबईत सोन्याचा दर ५६,२५४ रुपयांवर पोहोचला. आज दिल्लीत एक किलो चांदीचा दर ७७,२६४ रुपयांवरून ७७,८४० रुपयांवरून गेला. दिवसभरात चांदीचा दर किलोमागे ५७६ रुपयांनी वाढला. मुंबईत चांदीचा दर ७६ हजारांच्या पुढे गेला आहे.

जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. वुहानमधून जगात पोहोचलेल्या संकटानुळे सगळेच देश मेटाकुटीला आले आहेत. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापारी युद्ध सुरू आहे. त्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीला धक्का बसला आहे. त्यामुळे अनेकांनी गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य दिलं आहे.

Web Title: gold price surged for the 16th straight session on friday and touched an all time high of rs 57008 per 10 grams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं