Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold price: नव्या कोरोनाने फसवले, सोने घसरले; जाणून घ्या आजचा दर

Gold price: नव्या कोरोनाने फसवले, सोने घसरले; जाणून घ्या आजचा दर

Gold prices Today: सलग पाच दिवस आणि त्यातही सोमवारी ब्रिटनमधील कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे सोन्याचे दर वाढले होते. हा ट्रेंड पुढील काही दिवस असाच राहिल असा अंदाज होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 07:32 PM2020-12-22T19:32:59+5:302020-12-22T19:33:36+5:30

Gold prices Today: सलग पाच दिवस आणि त्यातही सोमवारी ब्रिटनमधील कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे सोन्याचे दर वाढले होते. हा ट्रेंड पुढील काही दिवस असाच राहिल असा अंदाज होता.

Gold price: Gold falls even after fears of new corona strain; Find out today's rate | Gold price: नव्या कोरोनाने फसवले, सोने घसरले; जाणून घ्या आजचा दर

Gold price: नव्या कोरोनाने फसवले, सोने घसरले; जाणून घ्या आजचा दर

Gold prices Today: सराफा बाजारात मंगळवारी सोन्याची घसरण झाली. सलग पाच दिवस आणि त्यातही सोमवारी ब्रिटनमधील कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे सोन्याचे दर वाढले होते. हा ट्रेंड पुढील काही दिवस असाच राहिल असा अंदाज होता. शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेत सोन्यामध्ये गुंतवण्यात आली होती. मात्र, आज सोन्याच्या दरात 243 रुपयांची घसरण झाली आहे. 


जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने भारतीय बाजारपेठेतही सोन्याचे दर घसरले. सोमवारी सोन्याचा दर 49,896 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. आज घसरणीनंतर 49,653 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला आहे. चांदीच्या दरातही मंगळवारी 216 रुपयांची घसरण झाली आहे. 67,177 प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1868 डॉलर आणि चांदी 25.70 डॉलर प्रति औंस झाली होती. 


सोमवारी ब्रिटनच्या कोरोनाच्या धास्तीने एकीकडे शेअरबाजार धाडकन कोसळला असताना सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या व चांदीच्या दरांनी भारतीय रिटेल बाजारात वाढ नोंदविली होती. दिल्लीमध्ये सोन्य़ाच्या दराने पुव्हा 50 हजारांचा आकडा पार केला होता. सोमवारी यात 496 रुपयांची वाढ होत सोने 50,297 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. तर मुंबईच्या रिटेल बाजारात सोन्याच्या दरात 200 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली होती. याची किंमत 50308 रुपये झाली होती.


पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सोन्याच्या किंमती घसरण्याची (Gold Price down) आशा व्यक्त केली जात आहे. २०२१ च्या सुरुवातीला सोने 42,000 प्रति ग्रॅम होण्याची शक्यता आहे. असे का होईल? याच्यामागे अनेक कारणे आहेत. मात्रस सर्वात मोठे कारण हे कोरोना आणि त्याला रोखण्यासाठी बनविण्यात येत असलेली लस हे आहे. 

2021 च्या सुरुवातीला 42000 वर येणार सोने; जाणून घ्या कारण...


कोरोना काळात सोन्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना सण, उत्सवांचा होता. यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. मात्र, लॉकडाऊन आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था यामुळे खरेदीदारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली. यामुळे सोन्याची चमक अचानक गायब होऊ लागल्याचे दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये सोने २६०० रुपयांहून स्वस्त झाले आहे. तर उच्चतम स्तरावरून सोने ४००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. 

Gold Rate: ब्रिटनच्या नव्या कोरोनाने सोन्याचे दर वाढायला प्रारंभ; पुन्हा रेकॉर्ड करणार?


ऑगस्टमध्ये सोने ५६३७९ रुपयांवर गेले होते. तेव्हा ते आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रशियाची स्तुतनिक व्ही कोरोना लस येताच सोन्याने कच खाल्ली. या आठवड्यात सोन्याचा ४ डिसेंबरचा वायदा भाव ४८१०६ प्रति १० ग्रॅमवर आला. शेवटच्या दिवशी सोन्यामध्ये ४११ रुपयांची घट नोंदविली गेली. गुरुवारी सोने 48517 रुपयांच्या स्तरावर बंद झाले. हा दर सोन्याच्या उच्च पातळीपेक्षा 8200 रुपयांनी कमी आहे. नोव्हेंबर महिन्याचा विचार करता ३० ऑक्टोबरला सोन्याचा दर 50699 रुपये प्रति १० ग्रॅम होता. मात्र, ९ नोव्हेंबरला तो वाढून 52167 रुपये झाला होता. यानंतर तो कमी जास्त होत राहिला आणि २७ नोव्हेंबरला 48106 रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. ६ नोव्हेंबरचा विचार करता सोन्याच्या दरात 4000 रुपयांची घट झाली आहे. पुढे कोरोना लस येण्याची शक्यता असल्याने हा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण गुंतवणूकदार आता सोन्यातून पैसा काढून घेऊ लागले आहेत. 

Web Title: Gold price: Gold falls even after fears of new corona strain; Find out today's rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.