Lokmat Money > बिझनेस न्यूज > घरबसल्या मोफत मिळवा पॅन कार्ड; ऑनलाइन अर्ज करताच मिळेल ई-पॅन

घरबसल्या मोफत मिळवा पॅन कार्ड; ऑनलाइन अर्ज करताच मिळेल ई-पॅन

प्राप्तिकर खात्याची सुविधा; आधारमार्फत माहितीची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 03:35 AM2019-11-06T03:35:33+5:302019-11-06T03:35:40+5:30

प्राप्तिकर खात्याची सुविधा; आधारमार्फत माहितीची पडताळणी

Get Free Home PAN Cards; E-PAN will be available as soon as you apply online | घरबसल्या मोफत मिळवा पॅन कार्ड; ऑनलाइन अर्ज करताच मिळेल ई-पॅन

घरबसल्या मोफत मिळवा पॅन कार्ड; ऑनलाइन अर्ज करताच मिळेल ई-पॅन

नवी दिल्ली : तुम्ही आतापर्यंत पॅन (परमनन्ट अकाऊं ट नंबर) कार्ड काढले नसेल वा असलेले पॅन कार्ड हरवले असेल तर आता तुम्हाला काही मिनिटांत पॅन कार्ड मिळू शकेल. तशी व्यवस्था प्राप्तिकर खात्याने केली असून, ती लवकरच देशभर सुरू होणार आहे. ही सुविधा अर्थातच आॅनलाइन असेल.

पॅन कार्डसाठी आॅनलाइन अर्ज करताना तुमची माहिती आधार कार्डवरील माहिती विचारली जाईल. त्यामुळे प्राप्तिकर खात्याला तुमच्या माहितीची पडताळणी करणे शक्य होईल. प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ई-पॅन सोय मोफत असेल. त्यासाठी आधार कार्डवरील माहितीच्या आधारे पडताळणी करण्यात येईल. म्हणजेच तुमचा जन्मदिनांक, पत्ता, वडिलांचे नाव ही माहिती प्राप्तिकर खात्याला मिळेल. त्यासाठी अर्ज करणाºयास ओटीपी (वन टाइम पासवर्ड) देण्यात येईल.

हे ई पॅन मिळवण्यासाठी आधार कार्डमध्ये असलेल्या माहितीखेरीज अन्य काही विचारणा करण्याची गरजही प्राप्तिकर खात्याला लागणार नाही. तुमचा पॅन तयार झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल सही असलेला ई-पॅन देण्यात येईल. त्यामध्ये क्यूआय (क्विक रिस्पॉन्स) कोड दिला जाईल. त्याद्वारे फसवणूक वा फोटोशॉपद्वारे बनावट पॅन तयार करणे असा गैरवापर रोखणे शक्य होईल.

दोन आठवड्यांत योजना सुरू
प्राप्तिकर खात्याने ही योजना काही प्रमाणात लागू केली असली तरी ती पूर्णाशांने अंमलात येण्यास एक वा दोन आठवडे लागतील. आतापर्यंत ६२ हजार लोकांना ई-पॅन कार्ड जारी करण्यात आली आहेत. ही सेवा तुम्हाला घरी बसल्याच ई-पॅन उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज भासणार नाही.

Web Title: Get Free Home PAN Cards; E-PAN will be available as soon as you apply online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.