Lokmat Money > बिझनेस न्यूज > जर्मन कंपनी वेबॅस्टो स्थापणार पुण्यामध्ये उत्पादन प्रकल्प

जर्मन कंपनी वेबॅस्टो स्थापणार पुण्यामध्ये उत्पादन प्रकल्प

वेबॅस्टो इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास प्रसाद यांनी सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:21 AM2021-03-09T05:21:19+5:302021-03-09T05:21:55+5:30

वेबॅस्टो इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास प्रसाद यांनी सांगितले

German company Webasto to set up manufacturing plant in Pune | जर्मन कंपनी वेबॅस्टो स्थापणार पुण्यामध्ये उत्पादन प्रकल्प

जर्मन कंपनी वेबॅस्टो स्थापणार पुण्यामध्ये उत्पादन प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ऑटो पार्टस‌्च्या निमिर्तीमधील ख्यातनाम जर्मन कंपनी वेबॅस्टो ही लवकरच भारतामध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. हा प्रकल्प पुण्यामध्ये असणार आहे. कंपनी २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून पुण्यामध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे.  या प्रकल्पामध्ये वाहनांसाठी लागणारे सनरुफ तयार केले जाणार आहेत.ही उत्पादने देशांतर्गत बाजारपेठ तसेच निर्यातीसाठी वापरली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले  आहे.

वेबॅस्टो इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास प्रसाद यांनी सांगितले की, गेल्या दशकापासून आम्ही पुणे परिसरामध्ये कार्यरत आहोत. देशातील सनरुफची वाढती मागणी लक्षात घेता आम्ही त्यांचे उत्पादन सुरू करीत आहोत. तसेच त्याच्या चाचणीची सुविधाही आता भारतातच उपलब्ध केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सनरूफ म्हणजे कारला वरच्या बाजुने उघड-झाप करता येणारे छत असते. सध्या त्याला मोठी मागणी आहे.

Web Title: German company Webasto to set up manufacturing plant in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.