flipkart the republic day sale will start from 20 january | Flipkart The Republic Day Sale: 'या' वस्तूंवर मिळणार बंपर सूट
Flipkart The Republic Day Sale: 'या' वस्तूंवर मिळणार बंपर सूट

ठळक मुद्देप्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा खास सेलचं आयोजन केलं आहे. The Republic Day सेल 20 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत राहणार आहे. SBI क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास ग्राहकांना 10 टक्के इन्स्टट सूट मिळणार आहे.

नवी दिल्ली - सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू आहे. फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा खास सेलचं आयोजन केलं आहे. या सेलमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंच्या खरेदीवर भरघोस सूट देण्यात आली आहे. 

फ्लिपकार्टने आपल्या The Republic Day Sale ची घोषणा केली आहे. हा सेल 20 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत असणार आहे. तसेच या सेलमध्ये SBI क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास ग्राहकांना 10 टक्के इन्स्टंट सूट मिळणार आहे. तर फ्लिपकार्ट प्लसचे सभासद या सेलमध्ये 19 जानेवारी रात्री 8 वाजल्यापासून खरेदी करू शकतील. सेलमध्ये सर्व प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डवर नो-कॉस्ट ईएमआय पर्याय उपलब्ध असेल, डेबिट कार्डवर ईएमआयचा लाभही घेता येणार आहे. 

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून फर्निचर, कपडे, किचनमधील सामानावर चांगला डिस्काउंट देण्यात आला आहे. The Republic Day Sale मध्ये विशेषत: स्मार्टफोन्सवर बंपर सूट देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दर आठ तासांनी  मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही, फॅशन आणि अन्य उत्पादनांवर अनेक ऑफर्स मिळणार आहेत. टीव्ही आणि इतर वस्तूंवर 75 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. सेलमध्ये 20 जानेवारीला Rush Hours ही असणार आहेत. ज्यामध्ये दोन वाजेपर्यंत अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच सेलच्या प्रत्येक दिवशी दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 26 टक्के अधिक सूट मिळणार आहे. 

फ्लिपकार्टच्या The Republic Day Sale मध्ये ग्राहकांना काही विशेष ऑफर्स देण्यात आल्या आहेत. सेलमध्ये 1,450 रुपयांच्या खरेदीवर 10  टक्के सूट मिळणार नाही. तर 1,950 रुपयांची शॉपिंग केल्यास 15 टक्के सूट मिळणार आहे. सेलमध्ये प्रत्येक 8 तासाला ग्राहकांसाठी नव्या डील्स येतील. सेलमध्ये फॅशन प्रकारात 40-80 टक्के सूट देण्यात आली आहे. तर सौंदर्य प्रसाधने, खेळणी, पुस्तके यांची सुरुवात 99 रुपयांपासून होईल. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ग्रॉसरीवर 90 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच फ्लिपकार्टच्या ब्रँडवर 70 टक्के सूट मिळेल. 

English summary :
Flipkart has announced its Republic Day Sale. This sale will be from January 20 to January 22. Also, if you use SBI Credit Card in this sale, you will get 10 percent instant discount. Flipkart Plus members can buy this sale from Jan 19 at 8 pm.


Web Title: flipkart the republic day sale will start from 20 january
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.