Lokmat Money > बिझनेस न्यूज > फ्लिपकार्टच्या किराणा डिलिव्हरी प्रोग्राममुळे महाराष्ट्रातील किराणा दुकानांची होतेय भरभराट!

फ्लिपकार्टच्या किराणा डिलिव्हरी प्रोग्राममुळे महाराष्ट्रातील किराणा दुकानांची होतेय भरभराट!

देशभरात डिलिव्हरी भागीदार म्हणून १ लाखाहून अधिक किराणा कार्यरत; किराणांच्या उत्पन्नात आणि कौशल्य विकासात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 11:47 AM2021-12-06T11:47:05+5:302021-12-06T11:47:59+5:30

देशभरात डिलिव्हरी भागीदार म्हणून १ लाखाहून अधिक किराणा कार्यरत; किराणांच्या उत्पन्नात आणि कौशल्य विकासात वाढ

Flipkart is helping drive prosperity for Maharashtra Kiranas through its Kirana delivery program | फ्लिपकार्टच्या किराणा डिलिव्हरी प्रोग्राममुळे महाराष्ट्रातील किराणा दुकानांची होतेय भरभराट!

फ्लिपकार्टच्या किराणा डिलिव्हरी प्रोग्राममुळे महाराष्ट्रातील किराणा दुकानांची होतेय भरभराट!

देशात १ कोटी २० लाख किराणा दुकानं असून त्यामुळे देशातील आधुनिक रिटेलचा पाया तयार होतो. गेल्या काही वर्षांत जुन्या आणि नव्या (ई-कॉमर्स) प्रकारच्या रिटेलची भागिदारी वाढली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना चांगला अनुभव मिळत असून इकोसिस्टिममधील भागिदारांची भरभराट होत आहे आणि त्यांचं कौशल्य वाढत आहे.

फ्लिपकार्टची वाढ भारतातच झाली असल्यानं विक्रेते, एमएसएमई, कारागीर, किराणा आणि विक्रेते भागीदार यांचा समावेश असलेली इकोसिस्टिम उंचावण्यासाठी फ्लिपकार्ट कटिबद्ध आहे.

किराणा डिलिव्हरी प्रोग्रामची सुरुवात २०१९ मध्ये झाली. ई-कॉमर्स नेतृत्त्व करत असलेला हा देशातील सर्वात मोठ्या प्रोग्रामपैकी एक आहे. यामध्ये १ लाखाहून अधिक किराणांचा समावेश आहे. देशात दर महिन्याला होत असलेल्या ६ कोटींहून अधिक डिलिव्हरीपैकी ३० टक्क्यांहून अधिक डिलिव्हरी या माध्यमातून होतात. या किराणांमध्ये जनरल स्टोर्स, ब्युटी पार्लर्स, गोदामं आणि विविध स्वरुपांच्या स्थानिक व्यवसायांचा समावेश आहे.

या व्यवसायांना डिलिव्हरीसाठी सज्ज करण्यासाठी फ्लिपकार्टनं सातत्यानं गुंतवणूक केली आहे. यासाठी फ्लिपकार्टनं वेगळी टीम तयार केली असून ती किराणांना माहिती, तंत्रज्ञान, अनुभव पुरवते. त्यामुळे किराणांना कोणत्याही अडथळ्यांविना लाखो डिलिव्हरी करणं शक्य होतं. गेल्या वर्षी या विशेष प्रशिक्षित किराणा भागिदारांनी देशभरात सणासुदीच्या कालावधीत १ कोटीहून अधिक डिलिव्हरी केल्या.

या प्रोग्राममुळे जीवनशैली उंचावल्याच्या आणि कौशल्यपूर्ण नेतृत्त्व पुढे आल्याच्या अनेक कहाण्या समोर आल्या.

महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये गोविंद विसपुते चंचल पेट स्टोर चालवतात. ते गेल्या अडीच वर्षांपासून फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी प्रोग्रामचा भाग आहेत. लॉकडाऊनमध्ये पाळीव प्राण्यांच्या पालकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासोबतच ते फ्लिपकार्टच्या शिपमेंट्स ग्राहकांच्या दारांपर्यंत पोहोचवत होते. या भागातील अतिशय सक्रिय किराणा भागीदार असलेल्या विसपुते यांना त्यांच्या प्रशिक्षणाचा वापर करता आला. 'फ्लिपकार्टकडून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे ग्राहकांना सक्षमपणे हाताळता आलं. त्यामुळे त्यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यासदेखील मदत झाली,' असं गोविंद यांनी सांगितलं.

गोविंद यांना या प्रोग्रामची माहिती त्यांच्या मित्राकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या एका मित्राला डिलिव्हरी करण्यास सांगितलं. यामुळे त्याची आर्थिक स्थिती सुधारली आणि त्यांना त्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत करता आलं.

पुण्यातील रणजीत सावंत किराणा डिलिव्हरी पार्टनर म्हणून फ्लिपकार्टसोबत खूप आधीपासून काम करत आहेत. त्यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत डिलिव्हरी इक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं. या कामाचा आनंद घेत असताना त्यांना स्वत:चा उद्योग सुरू करावासा वाटला. त्यामुळे २०१९ मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि श्लोक एंटरप्रायझेस नावानं फर्निचरचं दुकान सुरू केलं. मात्र किराणा डिलिव्हरी प्रोग्रामच्या माध्यमातून फ्लिपकार्टसोबत असलेले त्यांचं सहकार्य कायम राहिले.

'फ्लिपकार्टच्या सहकार्याचा मला खूप फायदा झाला. मी जवळपास डझनभर स्थानिक किराणा दुकानांना या प्रोग्रामशी जोडलं. त्यामुळे त्यांची भरभराट झाली,' असं रणजीत यांनी सांगितलं.

गोविंद आणि रणजीत यांच्याप्रमाणे अनेक लहान दुकानदारांची स्वप्नं साकार झाली. फ्लिपकार्टच्या किराणा प्रोग्रामनं दिलेल्या संधींमुळे त्यांना व्यवसाय वाढवता आला. ग्राहकांचं समाधान आणि वेळेवर होणाऱ्या डिलिव्हरी लक्षात घेऊन भागीदारांना कामाचे लवचिक तास मिळतात.

स्वत:च्या दुकानात जागा आणि अधिकचा वेळ असणारे कोणतेही लहान दुकान मालक किराणा डिलिव्हरी पार्टनर होऊ शकतात. त्यांनी ऑनबोर्डिंगसाठी अर्ज केल्यावर, पार्श्वभूमी तपासली जाते आणि काही सोप्या प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. यानंतर फ्लिपकार्टचे प्रतिनिधी दुकानाला भेट देऊन पडताळणी करून पार्श्वभूमी तपासतात.

यानंतर किराणा डिलिव्हरी भागिदारांना ४ दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येतं. यामध्ये ग्राहक व्यवस्थापन, डिलिव्हरी, रस्ते सुरक्षा यांचा समावेश असतो. ऑनबोर्डिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भागीदार शिपमेंट्स स्वीकारण्यासाठी, डिलिव्हरी करण्यासाठी पात्र ठरतात. भागीदारांनी दिलेल्या बँक खात्यात महिन्यातून दोनदा त्यांचं पेमेंट जमा होतं. 

इन्सेंटिव्हजच्या माध्यमातून ते अधिक उत्पन्नदेखील कमावू शकतात. विशेषत: सणासुदीच्या काळात अधिक उत्पन्न मिळवता येतं.

Web Title: Flipkart is helping drive prosperity for Maharashtra Kiranas through its Kirana delivery program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.