Lokmat Money > बिझनेस न्यूज > १० मे पासून LIC च्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा; शनिवारीही मिळणार सुट्टी

१० मे पासून LIC च्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा; शनिवारीही मिळणार सुट्टी

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एलआयसीची सर्व कार्यालये आता आठवड्यातून केवळ पाचच दिवस खुली राहणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:21 PM2021-05-06T16:21:23+5:302021-05-06T16:22:58+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एलआयसीची सर्व कार्यालये आता आठवड्यातून केवळ पाचच दिवस खुली राहणार आहेत.

A five day week for LIC employees from May 10 Saturday will also be a holiday coronavirus pandamic | १० मे पासून LIC च्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा; शनिवारीही मिळणार सुट्टी

१० मे पासून LIC च्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा; शनिवारीही मिळणार सुट्टी

Highlights१० मे पासून सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार कार्यालयेदावे निवारणात एलआयसीची उत्तम कामगिरी

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एलआयसीची सर्व कार्यालये आता आठवड्यातून केवळ पाचच दिवस खुली राहणार आहेत. १० मे पासून हा नियम लागू होईल. एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना आता शनिवारीदेखील सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कंपनीनं या संदर्भात १५ एप्रिल रोजी एक पत्रक काढलं होतं. १० मे पासून एलआयसीची सर्व कार्यालये सोमवार ते शुक्रवार या कालावधीतच सुरू राहतील. तसंच सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कामकाज सुरू राहिल, असंही सांगण्यात आलं. सध्या एलआयसीचे २९ कोटी पॉलिसीधारक आहेत.

यापूर्वी LIC कर्मचाऱ्यांना तब्बल २५ टक्के वेतनावाढ सरकारकडून मंजूर करण्यात आली होती. तसंच कामकाजाचा ५ दिवसांचा आठवडा केंद्र सरकारने मान्यही केला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास १ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. वेतनवाढीच्या वृत्ताने LIC कमर्चाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. २०१७ पासून LIC मध्ये वेतन आढावा बाकी होता. नवीन वेतनवाढ १ ऑगस्ट २०१७ पासून लागू होणार आहे. त्यामुळे वेतनवाढीचा फरक १ ऑगस्ट २०१७ पासून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. LIC कर्मचारी संघटनांनी ४० टक्के वेतवाढीची मागणी केली होती. तसेच केंद्र सरकारने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट १८८१ च्या कलम २५ मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे ५ दिवसांचा कामकाजाचा आठवडा एलआयसीला आता लागू होणार आहे.

अर्थजगतासाठी आव्हानात्मक ठरलेल्या या काळात LIC ची व्यावसायिक कामगिरी मात्र चमकदार ठरली आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये एलआयसीने नवीन हप्त्यांपोटी १.८४ लाख कोटी रुपये असे आजवरचं सर्वोच्च उत्पन्न कमावलं आहे. व्यक्तिगत विम्याच्या बाबतीत पहिल्या वर्षाच्या हप्त्यापोटी LIC उत्पन्न हे ५६,४०६ कोटी रुपये आहे, जे आधीच्या वर्षाच्या तुलनेत १०.११ टक्के वाढले आहे. (lic received highest new premium). LIC ने गेल्या वर्षात २.१० कोटी पॉलिसींची विक्री केली, ज्यापैकी ४६.७२ लाख पॉलिसी या केवळ मार्च २०२१ मध्ये विकल्या गेल्या आहेत.

दावे निवारणात एलआयसीची उत्तम कामगिरी

आधीच्या वर्षाच्या तुलनेत २९८.८२ टक्के अशी वाढ राखणारे प्रमाण आहे. मार्च २०२१ मध्ये विकल्या गेलेल्या आणि संपूर्ण वर्षात विकल्या गेलेल्या पॉलिसींमध्ये LIC चा बाजारहिस्सा हा अनुक्रमे ८१.०४ टक्के आणि ७४.५८ टक्के असा राहिला आहे. तर, प्रथम वर्षाचा हप्त्यांच्या बाबतीत LIC चा बाजारहिस्सा हा मार्च महिन्यासाठी ६४.७४ टक्के आणि संपूर्ण वर्षासाठी ६६.१८ टक्के असा राहिला आहे. कोरोनाच्या काळातील संचारबंदीचे निर्बंध असतानाही, दावे निवारणाच्या आघाडीवर LIC ने खूप चांगली कामगिरी केली. एकूण १.३४ लाख कोटी रुपयांचे विमेदारांचे दावे मंजूर केले गेले, जो नवीन उच्चांक आहे.
 

Web Title: A five day week for LIC employees from May 10 Saturday will also be a holiday coronavirus pandamic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.