Before filing GST return for the month of March ... | मार्च महिन्याचे जीएसटी रिटर्न भरण्यापूर्वी...

मार्च महिन्याचे जीएसटी रिटर्न भरण्यापूर्वी...


- उमेश शर्मा 
(लेखक चार्टर्ड  अकाउंटंट आहेत)

अर्जुन : कृष्णा, मार्च महिन्याचे जीएसटी रिटर्न भरण्यापूर्वी कोणत्या प्रमुख गोष्टीकडे व्यापाऱ्यांनी लक्ष द्यावे?
कृष्ण : अर्जुना, खालील दहा  प्रमुख गोष्टींकडे व्यापाऱ्यांनी लक्ष द्यावे :
१) २० एप्रिलपूर्वी जीएसटीआर-३ बी म्हणजेच जीएसटी रिटर्न भरावे. २) आर्थिक वर्ष २०-२१चे संपूर्ण आयटीसी जीएसटीआर-२ए आणि पुस्तकाच्या हिशोबाने टॅली करावे. फरक असल्यास शक्यतो मार्चच्या रिटर्नमध्ये ॲडजस्ट करावे. ३) नियम ३६ (४) अनुसार एकूण आयटीसीत ५ टक्क्याच्या वर फरक असल्यास ते शक्यतो मार्चच्या रिटर्नमध्ये ॲडजस्ट करावे व भरावे. ४) आर्थिक वर्ष २०-२१ मध्ये आयटीसी नियम ४२ आणि ४३ अनुसार टॅक्सेबल व एग्झम्ट विक्री अनुसार एकूण फरक असल्यास शक्यतो मार्चच्या रिटर्नमध्ये ॲडजस्ट करावे. ५) आर्थिक वर्ष २०-२१चे संपूर्ण विक्री जीएसटीआर-१ आणि जीएसटीआर-३बी आणि पुस्तकाच्या हिशोबाने टॅली करावे. फरक असल्यास शक्यतो मार्चच्या रिटर्नमध्ये ॲडजस्ट करावे व व्याज आणि कर भरून टाकावा. ६) क्यूआरपीएम स्कीमवाल्या करदात्यांनी मार्च क्वार्टरचे रिटर्न जानेवारी व फेब्रुवारीच्या ॲडजस्टमेंट बरोबर करून भरावे. ७) वर्षभरातील खरेदी विक्रीतील चुका दुरुस्त करण्यास मार्च २१चा रिटर्न हा एक उत्तम पर्याय आहे, अन्यथा जीएसटी वा आयकर या दोन्ही कायद्यातील विक्रीची तफावत पुढे त्रासदायक ठरू शकते.


८) विक्री सोडून वर्षभरातील इतर उत्पन्न- जसे व्याज,  कमिशन इत्यादी- तपासावे व ते शक्यतो मार्चच्या रिटर्नमध्ये  दाखवावे.  ९) अचल व चल संपत्तीची विक्री उदा.प्लांट आणि मशिनरी, फर्निचर इत्यादी विक्रीची अचूक जुळणी करावी. फरक असल्यास शक्यतो मार्चच्या रिटर्नमध्ये ॲडजस्ट करावे. १०) खरेदी विक्रीच्या पार्ट्यांचे लेजर मार्च, २१ पर्यंत टॅली करावे. डेबिट नोट, क्रेडिट नोट, डिसकाउंट, रेट डिफरन्स इत्यादी तपासावे व शक्यतो मार्चच्या रिटर्नमध्ये ते ॲडजस्ट करावे.

अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?
कृष्णा :  जीएसटीत आर्थिक वर्ष २०-२१च्या ॲडजेस्टमेंट  सप्टेंबर, २१ पर्यंत करण्याचा पर्याय आहे, परंतु सर्व ॲडजेस्टमेंट मार्चमध्ये केल्यास पुढे आयकर व जीएसटीत फरक नसेल व तसे झाल्यास करदात्यास पुढे चौकशांचा सामना करावा लागणार नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Before filing GST return for the month of March ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.