Lokmat Money > बिझनेस न्यूज > ABVKY योजनेत मोठा बदल, आता अधिक लोकांना मिळणार बेरोजगारी भत्ता

ABVKY योजनेत मोठा बदल, आता अधिक लोकांना मिळणार बेरोजगारी भत्ता

Atal Beemit Vyakti Kalyan Yojna : बेरोजगारांना तीन महिन्यांच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम देणारी ही योजना अलीकडेच जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती, पण आता त्यात आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 06:53 PM2021-10-03T18:53:59+5:302021-10-03T18:54:59+5:30

Atal Beemit Vyakti Kalyan Yojna : बेरोजगारांना तीन महिन्यांच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम देणारी ही योजना अलीकडेच जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती, पण आता त्यात आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे.

esic atal beemit vyakti kalyan yojna is updated again and more unemployed people in india can get benefit | ABVKY योजनेत मोठा बदल, आता अधिक लोकांना मिळणार बेरोजगारी भत्ता

ABVKY योजनेत मोठा बदल, आता अधिक लोकांना मिळणार बेरोजगारी भत्ता

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात नोकरी गमावलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी श्रम मंत्रालयाने (Labour Ministry) सुरू केलेली अटल बीमीत व्यक्ती कल्याण योजना (Atal Beemit Vyakti Kalyan Yojna) अतिशय फायदेशीर ठरत आहे. (esic atal beemit vyakti kalyan yojna is updated again and more unemployed people in india can get benefit)

बेरोजगारांना तीन महिन्यांच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम देणारी ही योजना अलीकडेच जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती, पण आता त्यात आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे केवळ अर्जाच्या अटी कमी केल्या नाहीत तर लाभार्थींची संख्या देखील वाढवली जाणार आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून (ESIC) प्राप्त माहितीनुसार, सन 2020 पासून आतापर्यंत सुमारे 80 हजार लोकांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत. ESIC ने या लोकांना बेरोजगारी (Unemployment) भत्ता म्हणून सुमारे 80 कोटी रुपये दिले आहेत. विशेष म्हणजे कोरोनाची दुसरी लाट निघून गेली आणि कोरोनाची प्रकरणे कमी झाली व परिस्थिती सामान्य झाली, तरी आतापर्यंत देशभरातून अर्ज येत आहेत.

ABVKY मध्ये होत असलेल्या बदलांविषयी, कर्मचारी राज्य विमा महामंडळातील (ESIC) विमा आयुक्त, रेव्हेन्यू अँड बेनिफिट, एम के शर्मा म्हणतात की, या योजनेअंतर्गत, पगाराच्या 50 टक्के जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जातात. तीन महिने म्हणजे अशी वेळ जेव्हा कोणतीही बेरोजगार व्यक्ती स्वतःसाठी नवीन नोकरी शोधू शकते.

दरम्यान, जर कोणाला नोकरी मिळाली आणि ESICमध्ये त्याचे योगदान येऊ लागले, तर ही रक्कम तीन महिन्यांपूर्वी थांबवली जाते. मात्र, जर तो पुन्हा नोकरीवर गेला तर तो उर्वरित हप्त्यांचा लाभ घेऊ शकतो.

एम के शर्मा यांच्या मते, आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. त्याला तत्त्वतः परवानगी देण्यात आली आहे, मात्र यासंदर्भात औपचारिक अधिसूचना अद्याप बाकी आहे. याअंतर्गत, अर्जदाराला आता नोंदणीचा ​​एक वर्ष आणि एक योगदान कालावधीनंतरही योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो, तर आतापर्यंत नोंदणीची दोन वर्षे आणि ईएसआयसीमध्ये दोन योगदान कालावधीसाठी अर्ज केला जाऊ शकतो.

तसेच, आता योजनेच्या अटी पूर्वीपेक्षा अधिक सोप्या करण्यात आल्या आहेत. ESIC मध्ये सहा महिन्यांचा योगदान कालावधी आहे, ज्यात योगदान किमान 78 दिवस असावे. मात्र, आता एका योगदान कालावधीच्या फायद्यामुळे, त्याच्या कार्यक्षेत्रात येणारे बरेच लोक अर्ज करण्यास सक्षम असतील.
 

Web Title: esic atal beemit vyakti kalyan yojna is updated again and more unemployed people in india can get benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.