Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO ग्राहकांना दिलासा;  UAN-आधार लिंक करण्याची मुदत वाढवली

EPFO ग्राहकांना दिलासा;  UAN-आधार लिंक करण्याची मुदत वाढवली

EPFO : EPFO ​​आणि आधार नंबर लिंक केले नाही, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 09:38 AM2021-09-13T09:38:33+5:302021-09-13T09:39:15+5:30

EPFO : EPFO ​​आणि आधार नंबर लिंक केले नाही, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल.

epfo subscribers last date for linking uan aadhaar extended till 31 december | EPFO ग्राहकांना दिलासा;  UAN-आधार लिंक करण्याची मुदत वाढवली

EPFO ग्राहकांना दिलासा;  UAN-आधार लिंक करण्याची मुदत वाढवली

नवी दिल्ली : कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO)​​ग्राहकांना EPF खाते आधार कार्डसोबत लिंक करण्याच्या बाबतीत काही दिलासा दिला आहे. लिंक करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी त्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती. EPFO ने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

जर तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत EPFO ​​आणि आधार नंबर लिंक केले नाही, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल. या व्यतिरिक्त, तुम्हाला ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात. जर EPF खातेधारकाचे खाते आधारशी जोडलेले नसेल तर ते EPFO ​​च्या सेवा वापरू शकणार नाहीत.

ही आहे याची प्रक्रिया...
>> सर्वप्रथम तुम्ही EPFO ​​पोर्टल epfindia.gov.in वर जा.
>> UAN आणि पासवर्ड वापरून तुमच्या खाते लॉग इन करा.
>> 'Manage'सेक्शनमध्ये  KYC ऑप्शनवर क्लिक करा.
>> त्यानंतर तुमच्या EPF खात्याशी जोडलेली अनेक डॉक्युमेंट्स पाहू शकता.
>> आधार ऑप्शन सिलेक्ट करा आणि आधार कार्डवर तुमचा आधार क्रमांक आणि तुमचे नाव टाईप करून save वर क्लिक करा.
>> तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित असेल, तुमचे आधार UIDAI च्या डेटा व्हेरिफाय केला जाईल.
>> तुमचे केवायसी डॉक्युमेंट योग्य असतील तर आधार कार्ड तुमच्या EPFखात्याशी जोडले जाईल आणि तुम्हाला तुमच्या आधार डिटेल्ससमोर Verify लिहिले दिसेल.
>>कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही EPF खात्यात पैसे टाकतात.
>> ईपीएफओ कायद्यांतर्गत कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या 12% डीए ईपीएफ खात्यात जाते. तर त्याच वेळी, नियोक्ता (कंपनी) देखील बेसिक पगाराच्या 12% आणि कर्मचाऱ्याच्या डीएचे योगदान देते. कंपनीच्या 12% योगदानापैकी 3.67% कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जाते आणि उर्वरित 8.33% कर्मचारी पेन्शन योजनेकडे जाते. EPF खात्यावर वार्षिक 8.50% व्याज मिळत आहे.



 

काय असतो UAN नंबर?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (EPFO) नोंदणीकृत होताच, कर्मचारी या संस्थेचा सदस्य बनतो आणि यासोबत त्याला 12 अंकी UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) देखील जारी केला जातो. या क्रमांकाच्या मदतीने ईपीएफओच्या सुविधा ऑनलाइन वापरता येतील. यूएएन नंबरच्या मदतीने कर्मचारी केवळ त्याच्या पीएफ खात्याचे पासबुक ऑनलाइन पाहू शकत नाही, तर तो त्याचा PF(प्रोव्हिडंड फंड) बॅलन्स ऑनलाइन तपासू शकतो.

Web Title: epfo subscribers last date for linking uan aadhaar extended till 31 december

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.