Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Diesel Price: इंधन पुन्हा महागले! सलग दुसऱ्या दिवशी डिझेलची दरवाढ; पेट्रोलचा भाव किती? जाणून घ्या

Petrol Diesel Price: इंधन पुन्हा महागले! सलग दुसऱ्या दिवशी डिझेलची दरवाढ; पेट्रोलचा भाव किती? जाणून घ्या

पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले असून, पेट्रोलच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 07:51 AM2021-09-27T07:51:32+5:302021-09-27T07:55:17+5:30

पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले असून, पेट्रोलच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

diesel hike 25 paise and petrol remain unchanged last 22 days know the today latest fuel rate in india | Petrol Diesel Price: इंधन पुन्हा महागले! सलग दुसऱ्या दिवशी डिझेलची दरवाढ; पेट्रोलचा भाव किती? जाणून घ्या

Petrol Diesel Price: इंधन पुन्हा महागले! सलग दुसऱ्या दिवशी डिझेलची दरवाढ; पेट्रोलचा भाव किती? जाणून घ्या

Highlightsगेल्या ४ दिवसांमध्ये ३ वेळा डिझेल दरवाढपेट्रोलचे दरात गेल्या २२ दिवसांत वाढ नाहीदेशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर

मुंबई: कच्च्या तेलाच्या महागाईची झळ सोसत इंधनदरवाढ रोखून धरणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले असून, पेट्रोलच्या दरामध्ये गेल्या २२ दिवसांत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सोमवारी जारी केलेल्या दरानुसार डिझेल २५ पैशांनी महागले आहे. (diesel price hike 25 paise and petrol remain unchanged last 22 days know the today latest fuel rate in india)

TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले!

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. मेक्सिकोच्या आखातातील तेल उत्पादक काही युनिट्स या वर्षाच्या अखेरीस इडा चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे ऑफलाइन राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

पेट्रोलचा दर २२ दिवसांपासून स्थिर

पेट्रोलियम कंपन्यांनी ०१ आणि ०५ सप्टेंबर रोजी पेट्रोलच्या दरात अनुक्रमे १५ पैशांची कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९८.९६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.६२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.६३ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.७० रुपये झाले आहे.

अबब! OYO Hotels तब्बल १ अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत; गुंतवणुकीची सुवर्ण संधी

डिझेलचा २५ पैशांनी महागले

गेल्या ४ दिवसांमध्ये ३ वेळा दर वाढवण्यात आल्यामुळे डिझेल ७० पैशांनी महाग झाले आहेत. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९६.९४ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.३२ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.९३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.४२ रुपये प्रती लीटर इतका आहे. 

TATA ची कमाल! ‘ही’ कंपनी देतेय सलग तिसऱ्या वर्षी बोनस; हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी

दरम्यान, देशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर असून, देशात भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सर्वाधिक आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही १०० रुपये प्रति लीटरपर्यंत गेली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. 
 

Web Title: diesel hike 25 paise and petrol remain unchanged last 22 days know the today latest fuel rate in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.