Lokmat Money > बिझनेस न्यूज > मस्तच! ATM कार्ड घरीच विसरलात पण डोन्ट वरी; 'ही' बँक देते कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा

मस्तच! ATM कार्ड घरीच विसरलात पण डोन्ट वरी; 'ही' बँक देते कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा

Bank and ATM : पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड घेऊन जाण्यात अडचण येत असेल किंवा एटीएम कार्ड घरी विसरला असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 03:10 PM2021-12-05T15:10:34+5:302021-12-05T15:21:22+5:30

Bank and ATM : पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड घेऊन जाण्यात अडचण येत असेल किंवा एटीएम कार्ड घरी विसरला असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

did you know that you can withdraw cash from bank of baroda atm without card | मस्तच! ATM कार्ड घरीच विसरलात पण डोन्ट वरी; 'ही' बँक देते कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा

मस्तच! ATM कार्ड घरीच विसरलात पण डोन्ट वरी; 'ही' बँक देते कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा

नवी दिल्ली - तुम्ही बँक ऑफ बडोदाचे (Bank of Baroda) ग्राहक असाल आणि पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड घेऊन जाण्यात अडचण येत असेल किंवा एटीएम कार्ड घरी विसरला असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना एटीएम/डेबिट कार्डशिवायही पैसे काढण्याची परवानगी देते. 

बँकेने या सुविधेला कॅश ऑन मोबाईल असं नाव दिलं आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये बँक ऑफ बडोदाचे एम-कनेक्ट प्लस अ‍ॅप असणे आवश्यक आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही देशातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून पैसे काढू शकता.

बँक ऑफ बडोदा कॅश ऑन मोबाईल सेवा

- बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना फक्त BOB M-Connect Plus अ‍ॅप उघडणे आणि कार्डलेस व्यवहारासाठी OTP जनरेट करणे आवश्यक आहे.

-  सर्वप्रथम एम-कनेक्ट प्लस अ‍ॅपवर लॉगिन करा आणि प्रीमियम सर्व्हिसेस टॅबवर टॅप करा.

- Cash on Mobile Service वर क्लिक करा.

- आता तुमचा खाते क्रमांक निवडा, रक्कम टाका आणि सबमिट करा.

- विनंती सबमिट केल्यानंतर बँक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवते.

- आता तुम्हाला या ओटीपीसह तुमच्या जवळच्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएमवर जावे लागेल आणि एटीएम स्क्रीनवर कॅश ऑन मोबाईल पर्याय निवडावा लागेल. 

- आता तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका आणि रक्कम टाका.


 

Web Title: did you know that you can withdraw cash from bank of baroda atm without card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.