dell jeep lic most trusted brands in india report | 'हे' आहेत भारतातील सर्वाधिक विश्वासू ब्रँड
'हे' आहेत भारतातील सर्वाधिक विश्वासू ब्रँड

ठळक मुद्देडेल हा लॅपटॉप ब्रँड भारतातील सर्वाधिक विश्वासू ब्रँड झाला आहे.टीआरएच्या ब्रँड ट्रस्ट रिपोर्टनुसार, 2019 मध्ये टॉप सात ब्रँडमध्ये एलआयसी ही एकमेव भारतीय कंपनी आहे.टाटा समूहाच्या ब्रँडची संख्या ही सर्वाधिक असून सर्वाधिक विश्वासू ब्रँडच्या लिस्टमध्ये टाटाचे 23 ब्रँड्स आहेत.

नवी दिल्ली - एखाद्या वस्तूची खरेदी करायची असल्यास सर्वप्रथम ब्रँड पाहिला जातो. ब्रँडेड वस्तू वापरण्याकडेच अनेकांचा जास्त कल असतो. प्रत्येक ब्रँड ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्याने अनेक अनेक गोष्टी करत असतो. डेल हा लॅपटॉप ब्रँड भारतातील सर्वाधिक विश्वासू ब्रँड झाला आहे. त्यानंतर वाहन कंपनी जीप आणि वीमा क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी एलआयसीचा नंबर लागतो. टीआरएच्या ब्रँड ट्रस्ट रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

टीआरएच्या ब्रँड ट्रस्ट रिपोर्टनुसार, 2019 मध्ये टॉप सात ब्रँडमध्ये एलआयसी ही एकमेव भारतीय कंपनी आहे. टॉप ब्रँडच्या लिस्टमध्ये अ‍ॅमेझॉन हा देशाचा चौथा तर अ‍ॅपल हा पाचवा सर्वात विश्वासू ब्रँड आहे. अ‍ॅपलचा आयफोन हा फोन सीरीजमध्ये सर्वात वर आहे. तर सॅमसंगचा मोबाईल फोन ब्रँड सहाव्या स्थानी आहे. एलजी टेलिव्हिजन सातव्या स्थानी असून कस्टमर इलेक्ट्रॉनिक्स सुपर कॅटेगिरीमध्ये अग्रस्थानी आहे. तर अवीवा लाईफ इन्सुरन्स आठवा विश्वासू ब्रँड ठरला आहे. मारूती सुझुकी नवव्या तर भारतीय स्टेट बँक (एसबीआय) दहाव्या स्थानी आहे. 

टाटा समूहाच्या ब्रँडची संख्या ही सर्वाधिक असून सर्वाधिक विश्वासू ब्रँडच्या लिस्टमध्ये टाटाचे 23 ब्रँड्स आहेत. तर गोदरेजचे 15 ब्रँड्स, अमूलचे 11 ब्रँड्सचा देखील समावेश आहे. एलजी, होंडा, कॅडबरी, नेस्ले, पार्लेले आणि डाबर 7-7 ब्रँड्सचं प्रतिनिधित्व करत आहे. टीआरए रिसर्चने 16 शहरांमधील 2315 लोकांचं मत लक्षात घेऊन हा रिपोर्ट तयार केला आहे. विविध ब्रँडच्या वस्तू सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्यातील विश्वासू ब्रँड नेमका कोणता हे जाणून घेण्याचा प्रयत्न टीआरएच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 

टाटा समूह देशात पहिला; जगातील टॉप 100 मध्येही एकमेव भारतीय ब्रँड

टाटा उद्योग समुहाने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रँड बनला असतानाच जगातील पहिल्या 100 ब्रँडमध्येही एकमेव भारतीय ब्रँड म्हणून जागा पटकावली आहे. इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेने 2019 मधील टॉप 500 ब्रँडमध्ये टाटा समुहाला 86 व्या स्थानावर ठेवले आहे. मागील वर्षी टाटा 104 व्या स्थानावर होता. तर अ‍ॅमेझॉन कंपनी 13.36 लाख कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह पहिल्या स्थानावर आहे. ब्रँड फायनान्सचे कार्यकारी अधिकारी डेव्हिड हेग यांनी सांगितले की, 2019 मध्ये टाटा समुहाच्या मुल्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 37.4 टक्क्यांची वाढ झाली. यामुळे टाटा समुहाने 18 जागांची मजल गाठत 86 वे स्थान पटकावले. यावर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, जगातील टॉप 100 मध्ये देशाची एकमेव कंपनी बनणे टाटा समुहाला भविष्यात सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदत करेल. लोकांना चांगली उत्पादने देण्याचा प्रयत्न राहील. 

 


Web Title: dell jeep lic most trusted brands in india report
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.