Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्राहक घेतात नवनवीन मसाल्यांची चव, केवळ २० टक्के वाटा ब्रॅण्डेड उत्पादनांचा

ग्राहक घेतात नवनवीन मसाल्यांची चव, केवळ २० टक्के वाटा ब्रॅण्डेड उत्पादनांचा

मसाल्यांचा देश ही भारताची जुनी ओळख आजही कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 04:30 AM2019-11-11T04:30:26+5:302019-11-11T04:30:32+5:30

मसाल्यांचा देश ही भारताची जुनी ओळख आजही कायम आहे.

Customers enjoy the taste of fresh spices, only 5% of branded products | ग्राहक घेतात नवनवीन मसाल्यांची चव, केवळ २० टक्के वाटा ब्रॅण्डेड उत्पादनांचा

ग्राहक घेतात नवनवीन मसाल्यांची चव, केवळ २० टक्के वाटा ब्रॅण्डेड उत्पादनांचा

मुंबई : मसाल्यांचा देश ही भारताची जुनी ओळख आजही कायम आहे. भारतामध्ये विविध प्रकारचे मसाले वापरले जात असून त्यांची एकूण बाजारपेठ ८० हजार कोटी रुपये आहे. मात्र यापैकी केवळ २० टक्के बाजारपेठ ही
ब्रॅण्डेड आणि पॅकिंगमधील मसाल्यांची आहे. मसाल्याच्या बाजारात आता नवनवीन खेळाडू उतरत असून येथे स्पर्धा वाढत असली तरी प्रत्येक कुटुंबाचा आपल्या पसंतीचा मसाला असतो, हे नक्कीच!
‘लोकमत’च्या इनसाईट टीमने राज्यातील विविध शहरांमध्ये त्याचप्रमाणे गावांमध्ये जाऊन केलेल्या सर्वेक्षणातून मसाल्यांचा वापर आणि त्याच्या प्रकारांबाबतची माहिती हाती लागली आहे. तीच येथे वाचकांसमोर मांडली आहे.
आजचा ग्राहक हा नवीन पाककृतींचा शोध घेऊन त्यांचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असल्याचे या सर्वेक्षणामधून उघड झाले आहे. सुमारे ७२ टक्के ग्राहक आपल्या आवडत्या पाककृतींचा विविध माध्यमांमध्ये शोध घेत असतात. यातून नवीन गोष्टी शोधून त्यांचा अनुभव घेण्याची वृत्ती
वाढीस लागलेली दिसून येत आहे. मसाले हे एफएमसीजी क्षेत्रामध्ये
मोडत असतात.
या क्षेत्रातील इमामी, सोसायटी यासारखे ब्रॅण्ड्स आता मसाल्यांच्या क्षेत्रामध्येही उतरले आहेत. याशिवाय सांघीज किचन, रिलायन्स सिलेक्ट, रिलायन्स गुडलाईफ यांसारखे
नवीन खेळाडूही या बाजारात
उतरले असल्यामुळे मसाल्याची बाजारपेठ अधिकच गरम होऊ
लागली आहे.
>वापरले जाणारे मिश्र मसाले
प्रकार राज्याची टक्केवारी गरम मसाला 73
बिर्याणी मसाला 61
किचन किंग मसाला 57
पनीर मसाला 43
छोले/चणा मसाला 41
मटण मसाला 37
भाजीचा मसाला 37
पास्ता मसाला 29
माशांसाठीचा मसाला 24
चाऊमिन/न्यूडल्स मसाला 23
>*स्रोत : या सर्व मजकुराचा
स्रोत हा लोकमतच्या इनसाइट्स टीमने सर्वेक्षण करून काढलेले निष्कर्ष तसेच वेगवेगळे अहवाल व कंपन्यांच्या संकेतस्थळांवरील माहिती हा आहे.

Web Title: Customers enjoy the taste of fresh spices, only 5% of branded products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.