Lokmat Money >क्रिप्टोकरन्सी > Cryptocurrency Bitcoin : दोन आठवड्यात क्रिप्टोकरन्सीनं केलं मालामाल, जानेवारीत बिटकॉईनमध्ये २७ टक्क्यांची उसळी

Cryptocurrency Bitcoin : दोन आठवड्यात क्रिप्टोकरन्सीनं केलं मालामाल, जानेवारीत बिटकॉईनमध्ये २७ टक्क्यांची उसळी

जानेवारी महिना क्रिप्टोकरन्सी मार्केट आणि गुंतवणूकदारांसाठी अतिशय चांगला दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 01:57 PM2023-01-14T13:57:34+5:302023-01-14T13:57:58+5:30

जानेवारी महिना क्रिप्टोकरन्सी मार्केट आणि गुंतवणूकदारांसाठी अतिशय चांगला दिसत आहे.

Cryptocurrency Bitcoin: Cryptocurrency gains in two weeks, Bitcoin jumps 27 percent in January | Cryptocurrency Bitcoin : दोन आठवड्यात क्रिप्टोकरन्सीनं केलं मालामाल, जानेवारीत बिटकॉईनमध्ये २७ टक्क्यांची उसळी

Cryptocurrency Bitcoin : दोन आठवड्यात क्रिप्टोकरन्सीनं केलं मालामाल, जानेवारीत बिटकॉईनमध्ये २७ टक्क्यांची उसळी

Cryptocurrency Bitcoin : जानेवारी महिना क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) आणि गुंतवणूकदारांसाठी अतिशय चांगला दिसत आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांचे नुकसान भरून काढले जात आहे. विशेष बाब म्हणजे जानेवारीतील सुमारे दोन आठवड्यांच्या व्यवसायादरम्यान बिटकॉइनच्या किमतीत (Bitcoin Price) जवळपास 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

विशेष बाब म्हणजे नोव्हेंबरनंतर प्रथमच क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप (Cryptocurrency Market Cap) एक ट्रिलियन डॉलर्स झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि प्रमुख क्रिप्टोकरन्सीची किंमत किती झाली आहे हे पाहू.

बिटकॉईनमध्ये 11 टक्क्यांची वाढ
जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या किमतीत 24 तासांच्या ट्रेडिंगमध्ये 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे आणि किंमत 20,968.77 डॉलर्सवर गेली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरात या चलनात सुमारे 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याबद्दल बोलायचे झाले तर बिटकॉइनच्या किमतीत 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये बिटकॉइनची किंमत 68,990.90 डॉलर्सवर पोहोचली होती.

इथेरियम आणि अन्य करन्सीचे काय?
दुसरीकडे, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या इथरियमच्या किमतीत गेल्या 24 तासांत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, इथरियमची किंमत 1,554.84 डॉलर्सपर्यंत खाली आली आहे. तर गेल्या 7 दिवसांत इथरियमने 23 टक्क्यांनी झेप घेतली आहे. Binance मध्ये गेल्या 7 दिवसात 17 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि आज सुमारे 6 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत आहे. कार्डानोमध्ये गेल्या एका आठवड्यात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Dogecoin ची किंमत 7 दिवसात 21.50 टक्क्यांनी वाढ झआली आहे. गेल्या 24 तासांत सोलानामध्ये 29 टक्के आणि 7 दिवसांत 65.73 टक्के वाढ दिसून येत आहे. शिबा इनूच्या किमतीत आज सुमारे 11 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

Web Title: Cryptocurrency Bitcoin: Cryptocurrency gains in two weeks, Bitcoin jumps 27 percent in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.