Lokmat Money > बिझनेस न्यूज > रशियाला 'धडा' शिकवण्यासाठी सौदी अरेबिया मैदानात; कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के कपात 

रशियाला 'धडा' शिकवण्यासाठी सौदी अरेबिया मैदानात; कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के कपात 

तेल निर्यातदार देशांची संघटना(OPEC) आणि इतर मित्र देशांच्यामध्ये तेल उत्पादनात कपात करण्यासंबंधी कोणताही करार होऊ शकलेला नाही.  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 09:56 AM2020-03-09T09:56:32+5:302020-03-09T10:05:27+5:30

तेल निर्यातदार देशांची संघटना(OPEC) आणि इतर मित्र देशांच्यामध्ये तेल उत्पादनात कपात करण्यासंबंधी कोणताही करार होऊ शकलेला नाही.  

Crude Oil Plunges 30% Drop In 29 Years, After Saudi Arabia Cuts oil Prices vrd | रशियाला 'धडा' शिकवण्यासाठी सौदी अरेबिया मैदानात; कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के कपात 

रशियाला 'धडा' शिकवण्यासाठी सौदी अरेबिया मैदानात; कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के कपात 

Highlightsआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के कपात नोंदवली गेली आहे. सौदी अरेबियानं रशियाबरोबर सुरू असलेल्या शीतयुद्धापायी कच्चा तेलाची किमती घटवल्याची आता चर्चा आहे.1991नंतर कच्च्या तेलाच्या किमतीतली ही सर्वात मोठी कपात आहे. त्याशिवाय कोरोना व्हायरसच्या भीतीनंही मागणी घटत असल्यानंही तेलाच्या पूर्ततेला वेग आला आहे.

टोकियोः आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के कपात नोंदवली गेली आहे. सौदी अरेबियानंरशियाबरोबर सुरू असलेल्या शीतयुद्धापायी कच्चा तेलाची किमती घटवल्याची आता चर्चा आहे. 1991नंतर कच्च्या तेलाच्या किमतीतली ही सर्वात मोठी कपात आहे. त्याशिवाय कोरोना व्हायरसच्या भीतीनंही मागणी घटत असल्यानंही तेलाच्या पूर्ततेला वेग आला आहे. तेल निर्यातदार देशांची संघटना(OPEC) आणि इतर मित्र देशांच्यामध्ये तेल उत्पादनात कपात करण्यासंबंधी कोणताही करार होऊ शकलेला नाही.  

30 टक्के कच्चा तेलाच्या किमतीत घसरण
आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्यूचर 14.25 डॉलर म्हणजेच 31.5 घसरून 31.02 डॉलर प्रतिबॅरलवर आला आहे. 17 जानेवारी 1991ला पहिलं खाडी युद्ध सुरू झालं आणि 12 फेब्रुवारी 2016नंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी कपात नोंदवली गेली. सध्या 0114 GMT वर 35.75 डॉलर प्रति बॅरल ट्रेड सुरू आहे.  अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूडच्या किमती 11.28 डॉलर म्हणजेच 27.4 टक्क्यांनी घसरून 30 डॉलर प्रतिबॅरलवर आल्या आहेत. खाडीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर जानेवारी 1991नंतरची डब्ल्यूटीआयमध्ये ही सर्वात मोठी घसरण होती, 22 फेब्रुवारी 2016नंतर हा सर्वात नीचांकी स्तर आहे.


मार्च महिन्याच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झालेल्या आहेत. देशातल्या प्रमुख महानगरांत लागोपाठ पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात घसरण झाली आहे. तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या किमतीत 23 ते 25 पैसे प्रतिलिटर एवढी कपात केली आहे. तर डिझेलच्या दरातही 25 ते 26 पैसे प्रतिलिटर कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक लीटरच्या पेट्रोलचा भाव 70.59 रुपये झाला आहे. तसेच एक लीटर डिझेलसाठी 63.26 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करत असतात. 

पेट्रोलचे दर नऊ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर; जाणून घ्या आजचे भाव

देशात सर्वात मोठा तेल निर्यातदार देश सौदी अरेबिया आहे. तर दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश रशिया आहे. त्यामुळेच सौदी अरेबियानं तेलाचे दर कमी करून रशियावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. ओपेक आणि कोरोना व्हायरसच्या प्रकोपानं मागणीत घट येत असल्यानं किमतीत कपात केल्याचं सौदी अरेबियानं सांगत त्याचं समर्थन केलं आहे. तसेच रशियानंही उत्पादन घटवण्यास नकार दिला आहे. त्यानंतर लागलीच रशियावर दबाव वाढवण्यासाठी सौदी अरेबियानं तेलाच्या किमतीत कपात केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलयुद्ध भडकल्याची स्थिती आहे. कारण सौदी अरेबिया रशियाबरोबरच्या त्याच्या ओपेकमधून बाहेर पडला असून, दबाव आणण्यासाठीच सौदी अरेबियानं आक्रमक पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. 

Web Title: Crude Oil Plunges 30% Drop In 29 Years, After Saudi Arabia Cuts oil Prices vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.