Lokmat Money > बिझनेस न्यूज > Coronavirus: कोरोनाचा मुकेश अंबानींना फटका, 70 दिवसांत बुडाले 1.11 लाख कोटी 

Coronavirus: कोरोनाचा मुकेश अंबानींना फटका, 70 दिवसांत बुडाले 1.11 लाख कोटी 

Coronavirus : शेअर बाजारातील ऐतिहासिक घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 05:26 PM2020-03-12T17:26:55+5:302020-03-12T17:32:03+5:30

Coronavirus : शेअर बाजारातील ऐतिहासिक घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Coronavirus: Mukesh Ambani Led Ril Share Price Tumbles 52 Week Low Amid Coronavirus Outbreak | Coronavirus: कोरोनाचा मुकेश अंबानींना फटका, 70 दिवसांत बुडाले 1.11 लाख कोटी 

Coronavirus: कोरोनाचा मुकेश अंबानींना फटका, 70 दिवसांत बुडाले 1.11 लाख कोटी 

Highlightsशेअर बाजारातील या ऐतिहासिक घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना सुद्धा कोरोनाचा फटका बसत आहे. चीन अन् इटलीला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे.

नवी दिल्ली : चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या कोरोना व्हायरसचा फटका भारतासह जगभरातील शेअर बाजारालाही बसला आहे. गुरुवारी शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 3100 अंकांची घट होऊन 32,600 वर बंद झाला. तर निफ्टीत 950 अंकांनी घसरण झाली असून 9,500 अंकांवर स्थिरावला आहे. 

शेअर बाजारातील या ऐतिहासिक घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, शेअर बाजार गडगडल्याने देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना सुद्धा फटका बसत आहे. रिलायन्सचे शेअर आज 52 आठवड्यांच्या नीचांकावर पोहोचले.

आज रिलायन्सचे शेअर 1063 वर बंद झाले, ज्यावेळी बाजारादरम्यान हे 1048 पर्यंत पोहोचले होते. 27 डिसेंबर 2019 रोजी वर्षाच्या शेवटी शेअर बाजारात रिलायन्सचा शेअर 1537 रुपये होता. गेल्या 70 दिवसांत शेअरच्या किंमतीत घट होऊन 1063 वर पोहोचली. एका शेअरची किंमत जवळपास 475 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. म्हणजेच, कोरोनो व्हायरस आणि इतर कारणांमुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये जवळपास 30 टक्के घसरण झाली आहे. 

याचबरोबर, शेअर बाजारातील घसरणीमुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या 70 दिवसांत 15.20 अरब डॉलर (1.11 लाख कोटी) इतके नुकसान झाले आहे. त्यामुळे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा बहुमान मुकेश अंबानी यांना गमवाला लागला आहे. आता ‘अलिबाबा’चे संस्थापक जॅक मा हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

दरम्यान, चीन अन् इटलीला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. 

आणखी बातम्या 

कोरोनाग्रस्तांनी नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करणार, पुणे विभागीय आयुक्तांचा इशारा

जगातील 114 देश कोरोणाच्या विळख्यात, आता या चार मोठ्या देशांत घालतोय थैमान

Big News : मोदी सरकारमधील परराष्ट्र मंत्रालय IPL 2020 आयोजनाच्या विरोधात, पण...

दर १०० वर्षांनी जगात येते रोगाची मोठी साथ, ४०० वर्षांत ४ मोठ्या साथींनी घेतले लाखो बळी

Web Title: Coronavirus: Mukesh Ambani Led Ril Share Price Tumbles 52 Week Low Amid Coronavirus Outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.