lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Coronavirus : कोरोनाचा फटका : देशातील वाहन कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प बंद

Coronavirus : कोरोनाचा फटका : देशातील वाहन कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प बंद

coronavirus : महिंद्रा अँड महिंद्रा, होंडा कार्स आणि फियाट यांनीही आपले प्रकल्प बंद केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:34 AM2020-03-24T00:34:01+5:302020-03-24T06:05:25+5:30

coronavirus : महिंद्रा अँड महिंद्रा, होंडा कार्स आणि फियाट यांनीही आपले प्रकल्प बंद केले आहेत.

Coronavirus: Country's production plants closed for production | Coronavirus : कोरोनाचा फटका : देशातील वाहन कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प बंद

Coronavirus : कोरोनाचा फटका : देशातील वाहन कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प बंद

नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणूमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटार्स आणि बजाज आॅटो या वाहन कंपन्यांनी आपले उत्पादन प्रकल्प बंद करण्याची घोषणा केली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, होंडा कार्स आणि फियाट यांनीही आपले प्रकल्प बंद केले आहेत.
देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने हरयाणातील आपले उत्पादन प्रकल्प बंद करण्याची घोषणा केली आहे. गुरुग्राम आणि मानेसर येथील उत्पादन प्रकल्प तसेच कार्यालये बेमुदत काळासाठी तत्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहेत. रोहतक येथील संशोधन व विकास संस्थाही बंद करण्यात येत आहे, असे मारुती सुझुकीने नियामकीय दस्तावेजात म्हटले आहे.
टाटा मोटार्सने पुण्यातील आपले उत्पादन प्रकल्प २४ ते ३१ मार्चपर्यंत बंद केला आहे. महिंद्रा अँड महिंद्राने नागपूर प्रकल्प रविवारीच बंद केला असून चाकण आणि कांदिवली येथील प्रकल्प सोमवारी रात्रीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जगातील सर्वांत मोठी दुचाकी वाहन उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने भारत, कंबोडिया आणि बांगलादेश येथील आपले सर्व उत्पादन प्रकल्प बंद केले आहेत. कंपनीचे राजस्थानातील ग्लोबल पार्ट्स सेंटरही बंद करण्यात आले आहे. फियाट क्रिसलरने पुण्याजवळील रांजणगाव येथील उत्पादन प्रकल्प बंद केला आहे. होंडा कार्सनेही आपले प्रकल्प बंद केले आहेत. होंडाचे अध्यक्ष व सीईओ गोकू निकानिशी यांनी सांगितले की, ‘एकत्रित प्रयत्नांच्या बळावर आपण या संकटावर नक्कीच मात करू.’

आठ आठवडे बंदीची तयारी
बजाज आॅटोने आकुर्डी, चाकण आणि औरंगाबाद येथील प्रकल्प सोमवारपासून बंद केले आहेत. हा बंद आठ आठवड्यांपर्यंत सुरू ठेवला जाऊ शकतो, असे कंपनीने म्हटले आहे. यामुळे या प्रकल्पात काम करणारे अनेक कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचे येत्या काही दिवसात हाल होण्याची भीती आहे.

Web Title: Coronavirus: Country's production plants closed for production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.