Lokmat Money > बिझनेस न्यूज > Coronavirus : कोरोना देऊन जाणार जागतिक मंदी, आनंद महिंद्र यांचे भाकीत

Coronavirus : कोरोना देऊन जाणार जागतिक मंदी, आनंद महिंद्र यांचे भाकीत

कोरोना विषाणूच्या साथीवर आपल्याला विजय नक्कीच मिळेल; पण हे संकेट संपेल तेव्हा जगभरात प्रचंड आर्थिक मंदी आलेली असेल आणि त्याची फार मोठी किंमत सर्वांनाच चुकवावी लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 06:45 AM2020-03-21T06:45:30+5:302020-03-21T06:45:59+5:30

कोरोना विषाणूच्या साथीवर आपल्याला विजय नक्कीच मिळेल; पण हे संकेट संपेल तेव्हा जगभरात प्रचंड आर्थिक मंदी आलेली असेल आणि त्याची फार मोठी किंमत सर्वांनाच चुकवावी लागणार आहे.

Coronavirus: Corona will give World recession- Anand Mahindra | Coronavirus : कोरोना देऊन जाणार जागतिक मंदी, आनंद महिंद्र यांचे भाकीत

Coronavirus : कोरोना देऊन जाणार जागतिक मंदी, आनंद महिंद्र यांचे भाकीत

मुंबई : कोरोना विषाणूची महामारी जगभरात प्रचंड मंदी मागे सोडून जाणार आहे. या जागतिक मंदीमुळे असंख्य छोटे व्यावसायिक, स्वयंरोजगार करणारे तरुण तसेच अनेक उद्योजक व रोजीरोटी कमावणारे काही लाख मजूर यांना सर्वाधिक नुकसान होणार आहे, असे महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी शुक्रवारी म्हटले आहे.
आपल्या टिष्ट्वटमध्ये आनंद महिंद्र म्हणाले की, कोरोना विषाणूच्या साथीवर आपल्याला विजय नक्कीच मिळेल; पण हे संकेट संपेल तेव्हा जगभरात प्रचंड आर्थिक मंदी आलेली असेल आणि त्याची फार मोठी किंमत सर्वांनाच चुकवावी लागणार आहे.
या मंदीमुळे सर्वात जास्त नुकसान व्यावसायिक, स्वयंरोजगार असणारे उद्योजक व रोजंदारी कामगारांचे होईल, असे भाकीतही आनंद महिंद्र यांनी वर्तवले.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे जेवढे लोक मृत्युमुखी पडतील, त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक तणाव, तसेच स्वत:चा रोजगार गेल्यामुळे अथवा घर गमावल्यामुळे मृत्युमुखी पडतील. अशी स्थिती यापूर्वी दुसरे महायुद्ध संपल्यानंतर निर्माण झाली होती, असेही आनंद महिंद्र म्हणाले.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने युरोपमधील उद्योगांचे पुनरुज्जीवन केले होते. यावेळी मात्र असे घडणार नाही, कुणीही एक़ विजयी ठरणार नाही आणि सर्वच पराजित असतील. त्यामुळे प्रत्येक देशाला वेगळी रणनीती आखून औद्योगिक तेजी कशी आणता येईल, याचा विचार करावा लागेल, असे महिंद्र म्हणाले.

ते वातावरण १९७५ पर्यंत टिकले
दुसºया महायुद्धानंतर अमेरिकेने मार्शल प्लॅन लागू करून युरोपमधील उद्योगांचे पुनरुज्जीवन केले होते व त्या उद्योगांना भरपूर आर्थिक मदतही केली होती. त्यावेळी अमेरिकेने आपली अर्थव्यवस्था जागतिक व्यापारासाठी खुली केली होती व त्यामुळे जगभर औद्योगिक तेजीचे वातावरण निर्माण झाले होते व ते १९७५ पर्यंत टिकले होते, असेही महिंद्र म्हणाले.

Web Title: Coronavirus: Corona will give World recession- Anand Mahindra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.